🌟मोहम्मद सलीम तेली व मित्र परिवाराने केले बाबाजानी दुर्राणी यांचे जंगी स्वागत🌟
फुलचंद भगत
वाशिम:-कारंजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)गटाचे पाथरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व माजी विधान परिषद सदस्य तथा औरंगाबाद वक्फ बोर्डचे माजी सदस्य बाबा जानी दुर्राणी यांचे दिनांक २४/०९/२०२४ ला कारंजा शहरातील समाज सेवक सलीम तेली यांच्या निवासस्थानी आगमन झाले.
त्यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, समाजसेवक सलीम तेली यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच उपस्थित असलेले शहरातील अरविंद लाठीया, कारंजा शहर ए काझी रफीउल्ला,ॲडव्होकेट फारुख खान,राजु सेठ लाहोटी,जुम्माभाई पप्पुवाले,रफतउल्ला काझी, मोहम्मद सलीम तेली, अब्दुल राजिक शेख, सैय्यद इर्शाद, इमरान शेख,तोसिफ खान,नदीम खान, इरफान शेख, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच कारंजा शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली,माजी आमदार बाबा जानी दुर्राणी यांना भेटण्यासाठी समाजसेवक मोहम्मद सलीम तेली यांच्या घरी अनेक नागरिक जमा झाले होते,माजी आमदार बाबा जानी दुर्राणी यांनी प्रत्येक व्यक्तीशी चर्चा करुन समस्या जाणून घेतले यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या