🌟ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल तो क्षणच अनंत - चतुर्दशी.....!


🌟जातील निघुन सारेच कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला...ना चुकेल हा फेरा जन्माला आलेल्या कोणाला...🌟

*जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव*

*होतील तीच अनंत - चतुर्दशी  !*

            

*पाहुणा आहे इथे प्रत्येकजण*

 *गणपती बाप्पासारखा काही दिवसांचा*

*कोणी 50 वर्षाचा, कोणी 60 वर्षांचा*

*तर कोणी त्याहीपेक्षा जास्त वर्षाचा...*


*थोडा वेळ आहोत इथे*

*तर थोड जगुन घेऊया*

*गणपती बाप्पा सारखे थोडे*

*लाडु मोदक खाऊन घेऊया...*


*इथे सर्वच आहेत भक्त आणि*

*सगळ्यांमध्ये आहे गणपती बाप्पा*

 *थोडा वेळ घालवू सोबत*

*आणि मारु थोड्या गप्पा..*


*मनामनातले भेद मिटतील*

*मिटतील सारे वाद*

*एक होईल माणुस*

*आणि साधेल सुसंवाद...*


*जातील निघुन सारेच*

*कधी ना कधी अनंताच्या* *प्रवासाला*

*ना चुकेल हा फेरा*

*जन्माला आलेल्या कोणाला...*


*गणपती बाप्पा सारखं  यायचे*

*आणि लळा लावुन जायचे*

 *काही दिवसांचे पाहूणे आहोत  आपण  या जगात* 

*असे समजून जगायचे...*


*किंमत तुमची असेलही*

*तुमच्या प्रियजनांना लाख*

*आठवणी ठेवतील जवळ* 

*अन् विसर्जित करतील तुमची राख...*


*पाहुणा आहे ईथे प्रत्येकजण*

*दीड दिवस अन् दहा दिवसाचा*

*हे जगणे म्हणजे एक उत्सव* 

*हा काळ दोन घडींच्या सहवासाचा...                       

अनंत चतुर्दशीच्या आपणास सर्वांना शुभेच्छा.......

- शुभेच्छुक -

 पत्रकार मोहन चौकेकर 

मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख 💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या