🌟नांदेड येथील बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नांना यश...‌!


🌟सचखंड हुजुर साहीब गुरुद्वारा बोर्डाची जमीन पेट्रोल पंपासाठी देण्याचा निर्णय स्थिगित🌟


नांदेड (दि.२८ सप्टेंबर २०२४) - शहराच्या मध्यवर्ती भगतसिंग रोड व हिंगोली गेट परिसरात असलेल्या गुरुद्वारा बोर्डाचे जमीन पेट्रोल पंपाच्या कारणास्तव भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. या विरोधात बाबा फत्तेहसिंहजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्थानिक शिख बांधवांनी यांनी धरणे आंदोलन केले असता पेट्रोल पंपाला जागा देण्याचा निर्णय स्थगित केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

     शहरातील भगतसिंघ रोड व हिंगोली गेट परिसरामध्ये गुरुद्वारा बोर्डाची मोकळी जमीन आहे. या जागेवर भाडेतत्त्वावर पेट्रोल पंप उभारण्यास करिता गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासकांनी टेंडर काढले होते. त्यास बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे व शीख समाजाने विरोध दर्शवित शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी गुरुद्वारा गेट नंबर एक दर्शन देवडी येथे धरणे आंदोलन  सुरु केले होते. मनबीरसिंघ ग्रंथी यांनी दिलेल्या निवेदनात गुरुद्वारा बोर्डाची कोणतीही मोकळी जमीन अथवा मालमत्ता भाडेतत्त्वावर न देण्याचा ठराव बोर्डाच्या कमिटीने घेतला होता. परंतु विद्यमान प्रशासकांनी हे टेंडर काढले असल्याने ग्रंथी यांनी रोष व्यक्त करीत सदर टेंडर रद्द करण्याची मागणी प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ व गुरुद्वारा अधीक्षकांकडे केली होती. त्यांच्या  मागणीला यश आले असून गुरुद्वारा बोर्ड अधीक्षकांनी आर.डी. सिंघ यांनी  सदर टेंडर स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करून तशा आशयाचे पत्र आंदोलकांना करताना दिले आहे. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष शेरसिंघ फौजी, माजी सचिव भागींदरसिंघ घडीसाज, रविंद्रसिंघ बुंग‌ई, गुरमितसिंघ महाजन यांची उपस्थिती होती.

    या आंदोलनामध्ये बाबा फत्तेहसिंघजी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनबीरसिघ ग्रंथी, विरेंद्रसिंघ बेदी, मनिंदरसिंघ (राज) रामगडीया, जसबीरसिंघ बुंगई, बक्षीसिंघ पुजारी, भोलासिंघ गाडीवाले, महेलसिंघ लांगरी ,महेंद्रसिंघ पैदल , प्रेमजीतसिंघ शिलेदार, नरेंद्रसिंघ ग्रंथी, हरभजनसिंघ पुजारी , करणपालसिंघ लोणीवाले , बादलसिंघ महाजन, गुरप्रीतसिंघ सोखी, बलजीतसिंघ शहा, जगजीतसिंघ खालसा , बंदीछोडसिंघ खालसा, हरविंदरसिंघ रागी , जसबीरसिंघ हूंदल, परशनसिंघ नहेंग, साहेबसिंघ लांगरी, सुखबीरसिंघ फौजी, परविंदरसिंघ लोहिया , हरप्रीतसिंघ होटलवाले , विक्कीसिंघ लांगरी, बबलूसिंघ डोरलीवाले यांच्यासह असंख्य शिख बांधवांनी सहभाग घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या