🌟कायदा व सुव्यव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त🌟
वाशिम:-गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची दि.१८ सष्टेबर रोजी गणेश विसर्जनानं सांगता झाली.मंगरुळपीर येथील गणेशविसर्जन हे ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन दि.१७ सष्टेबर रोजी करण्यात आलं.मंगरुळपीर शहराचा मानाचा गणपती असलेल्या संत श्री.बिरबलनाथ महाराज गणपतीची शासकीय अधिकार्यांनी महापुजा करुन आरती केली.
त्यानंतर दुपारी साडेतीननंतर सार्वजनिक गणेशविसर्जनाला सुरुवात करण्यात आली.मानाच्या गणपतीचे पुजन आणी आरती मंगरुळपीरचे ऊपविभागिय अधिकारी राजेंद्र जाधव,ना.तहसिलदार रविंद्र राठोड,ठाणेदार सुधाकर आडे,श्री.संत बिरबलनाथ संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी,पुष्पाताई रघुवंशी,अविश रघुवंशी,माजी नगराध्यक्ष विरेंद्रसिंह रघुवंशी,कृष्णा रघुवंशी,योगेश रघुवंशी,ओम दुबे,श्याम खोडे,अनिल गावंडे,सुनिल मालपाणी,शमशोद्दीन जहागीरदार,सलिम जहागिरदार,उबेद मिर्झा,गजंफर हुसैन,पञकार फुलचंद भगत आणी भाविकांची ऊपस्थीती करण्यात आली.या विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वृत्त लिहेपर्यत गणेशविसर्जन मिरवणुक शांततेत आणी मोठ्या ऊत्साहामध्ये सुरु होती.....
0 टिप्पण्या