🌟पुर्णा नगर परिषदेचा कारभार पुन्हा प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या हाती : प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जयंत सोनवणे यांची नियुक्ती



🌟नगर परिषदेचा कारभार सुधारण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेत प्रभारी मुख्याधिकारी सोनवणे स्वच्छता मोहीम राबवतील काय ?🌟

पुर्णा (दि.१४ सप्टेंबर २०२४)  :- पुर्णा शहराच्या सर्वांगीण विकासाला कायमस्वरूपी मुठमाती देऊन निकृष्ट व बोगस विकासकामांची मालिका चालवत कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी जिरवण्यात संपूर्ण जिल्ह्यात अव्वलस्थानी असलेल्या पुर्णा नगर परिषदेचे कायमकारभारी अर्थात कायमस्वरुपी वादग्रस्त मुख्याधिकारी युवराज पौळ यांची जिल्ह्यातील सेलू नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार आता पुन्हा प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आला असून प्रभारी मुख्याधिकारी म्हणून गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असून त्यांची प्रभारी मुख्याधिकारी म्हणून परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्ती केली आहे.

पुर्णा नगर परिषदेचे कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून युवराज पौळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा कार्यकाल कायमस्वरूपी वादग्रस्त ठरला असून शहरातील विविध भागांच्या विकासासाठी आलेल्या शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीची निर्मनुष्य भागात सोयीस्कररीत्या वाट लावून विकासाची आवश्यकता असलेल्या भागांमध्ये मात्र नागरिकांना उत्कृष्ट सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्या तसेच मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्याचे पाप झाले शहरातील स्वच्छता,पथदिवे,स्वच्छ पाणीपुरवठा आदीं सुविधांसह पंतप्रधान आवास योजना,रमाई घरकुल योजना तसेच विविध शासकीय योजनांपासून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवून लबाडांचे चांगभले करण्यास मुख्याधिकारी पौळ यांचा अकार्यक्षम कारभार कारणीभूत ठरला असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होतांना दिसत असून मुख्याधिकारी पौळ यांच्या कारकिर्दीत त्यांचे नगर परिषदेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यात समन्वय नसणे, कर्मचारी सतत गैरहजर राहणे आदींसह अनेक गैरप्रकार देखील घडले त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांना प्रथमतः प्रशासकीय कारभार सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार असून बोगस विकासकामांना लगाम घालण्यासाठी टक्केवारी पध्दत संपुष्टात आणावी लागणार असल्याचे स्पष्ट मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.

प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जयंत सोनवणे यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निकृष्ट व बोगस विकासकामांची प्रत्यक्षात पाहाणी करुन संबंधित कामांच्या गुत्तेदांरांना दर्जाहीन कामांच्या सुधारणे संदर्भात आदेश जारी करुन अंश्या भ्रष्ट गुत्तेदारांचा काळ्या यादीत समावेश करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावी लागणार आहे प्रभारी मुख्याधिकारी सोनवणे त्यादृष्टीने कठोर पावलं उचलतात की नाही याकडे तमाम शहरवासीयांची नजर राहणार आहे पुर्व मुख्याधिकारी पौळ यांच्या कारकिर्दीत सन २०२३/२४ या वर्षात शहरातील विविध प्रभागांमधील अनावश्यक ठिकाणी कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली खरी परंतु या विकासकामांचे नागरिकांना काही देखील सोयरसुतक नाही त्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेला कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी भ्रष्ट गुत्तेदार तत्वभ्रष आजी/माजी लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट नौकरशहांच्या घषात अडकल्याचे पहावयास मिळत आहे पुर्व मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या कारकिर्दीत पुर्णा नगर परिषदेचा कारभार एकंदर 'आंधळं दळतंय अन् कुत्र पिठ खातयं' अशा पध्दतीचा झाला होता वसूली विभाग तसेच स्वच्छता विभाग व बांधकाम विभागात देखील त्यांच्या कारकिर्दीत अनेक गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलेले प्रभारी मुख्याधिकारी सोनवणे नगर परिषद प्रशासनाचा कारभार सुधारण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेत स्वच्छता मोहीम राबवतील काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे........

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या