🌟पुर्णेतील महाविर नगरातील अपवित्र विहिरीत पवित्र गणपती विसर्जनास नागरिकांचा विरोध नगर परिषदेला दिले निवेदन...!


🌟पवित्र देवाला अपवित्र विहिरच का ? विसर्जन करायचं आहे विटंबना नाही🌟 


🌟उद्या माझा घरचा गणपती महावीर नगरच्या विहिरीत विसर्जन करणार नाही : सोशल मिडियावरील संदेशाने जनजागृती🌟 

पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली गणेशोत्सव काळात प्रशासकीय व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची जवाबदारी पार पाडणाऱ्या नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन व महाराष्ट्र राज्य महावितरण विभाग या तिन्ही विभागांपैकी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र राज्य महावितरण विभागातील अधिकारी/कर्मचारी वगळता पुर्णा नगर परिषद प्रशासनाने म्हणावी त्या पध्दतीने आपली जवाबदारी पार पाडली नाही असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही असे स्पष्ट मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.


पुर्णा नगर परिषद प्रशासनाने गणेशोत्सव काळात मिरवणूक मार्गांची दुरुस्ती रोडलाईट अर्थात बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्तीसह गणपती विसर्जनासाठी उपयोगी असलेल्या जलकुंभ अर्थात विहिरींचा संपूर्णपणे उपसा करुन विहिरी स्वच्छ करणे,शहरातून वाहणाऱ्या पुर्णा/थुना नद्यांवरील गणपती विसर्जनस्थळ बरमाळ पुल/बॉम्बे पुलांसह नदीकाठावरील विसर्जन स्थळावर खबरदारी म्हणून कठडे तयार करणे आदी कामांसह गणेशोत्सवात सार्वजनिक ठिकाणी उपद्रव गाजवणाऱ्या मोकाट जनावर गाई/वळू डुकरं,गाढव आदी जनावरांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक होते परंतु या महत्वाच्या बाबींकडे नगर परिषद प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरांमध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशांचे विसर्जन गवळी गल्ली तसेच महाविर नगरातील 'नृसिंह बावडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरातन विहिरींमध्ये केले जाते परंतु सदरील पुरातन विहिरींच्या सुरक्षा व स्वच्छतेकडे पुर्णा नगर परिषद प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे या विहिरींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून महाविर नगर परिसरातील 'नृसिंह बावडी' मध्ये आसपास बेकायदेशीर चालणारे चिकन/मटन शॉप चालक तसेच व्हेज/नॉनव्हेज खानावळ हॉटेल चालक तसेच बिअर बार परमीटरुम/रेस्टॉरंट,रुग्णालय दिवसभरातील घाण या विहिरीत उलटवत असल्याने ही विहिर गणपती विसर्जनासाठी अपवित्र झाल्यामुळे या अपवित्र विहिरीत पवित्र गणपती विसर्जनास प्रतिबंध करावा अशी मागणी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे जागृक नागरिक परशुराम उर्फ बाळू जोगदंड यांनी दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती परंतु निष्क्रिय नगर परिषद प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे व महाविर नगर येथील नृसिंह बावडी या विहिरीचे वरवर स्वच्छता करीत स्वच्छतानाट्य रंगवल्याने आता सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांनी जनजागृतीला सुरुवात केली असून " पवित्र देवाला अ पवित्र वीहिरच का ? उद्या माझा घरचा गणपती महावीर नगरच्या अपवित्र विहिरीत विसर्जन करणार नाही....विसर्जन करायचं आहे विटंबना नाही....गणपती बाप्पा मोरया.... असा हृदयस्पर्शी संदेश सोशल मिडियाच्या माध्यमातून दिला जात आहे.... त्यामुळे जागृक श्री गणेशभक्त नागरिकांनी आपल्या श्री गणेशाचे विसर्जन करतांना दोन पावलं दुर जावं लागलं तरी स्वच्छ विहिरीत किंवा नदीपात्रात स्वसुरक्षेला प्राथमिकता देऊन गणपती बाप्पाचे विसर्जन करावे असा संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राज उर्फ गोविंद ठाकर यांनी दिला आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या