🌟मंगरूळपीरच्या जवानांची साहसी कामगीरी 60 फुट खोल विहरीतुन बाहेर काढला मृतदेह🌟
फुलचंद भगत
वाशिम:-अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,शाखा मंगरूळपीरच्या जवानांची साहसी कामगीरी 60 फुट खोल विहरीतुन बाहेर काढला मृतदेह.
मानोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील देवठाणा येथील शेतातील विहरीत एक ईसम बुडाल्याची माहीती आज दुपारी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले क्षणाचाही विलंब न करता मंगरूळपीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे,गोपाल गीरे,शुभम भोपळे,लखन खोडे,सागर डाके,यांना आज घटनास्थळी पाठवीले आणी तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले असता आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी अथक प्रयत्नांनंतर विहरीतील मृतदेह बाहेर काढून पोलीसांच्या ताब्यात दीला.मृतक हे गणेश शेषराव वानखडे अं.वय (35) वर्ष रा.देवठाणा ता.मानोरा जि.वाशिम येथील असल्याचे निष्पन्न झाले यावेळी मानोरा पोलीस ठाण्याचे पिआय प्रविण शिंदे,पिएसआय अभिजीत बारे, पो.हे.काॅ.अमर धनकर आणी नातेवाईक हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे......
0 टिप्पण्या