🌟पुर्णेतील शहरातील भदंत उपाली थेरो नगरातील बुद्ध विहारात दोन दिवसीय बौद्ध धम्म संस्कार शिबिराचे आयोजन....!


🌟बौद्ध उपासक-उपासिकांसाठी दि.२७ व दि.२८ सप्टेंबर या दोन दिवस बौद्ध धम्म संस्कार शिबिराचे आयोजन🌟

पुर्णा :- पुर्णा येथील बौद्ध धम्माचे मोठे धम्म संस्कार केंद्र असलेल्या बुद्ध विहारात दोन दिवशीय बौद्ध धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्य आयोजक भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी दिली पुर्णेच्या बुद्ध विहारास महाराष्ट्र शासनाचा पवित्र तीर्थक्षेत्राचा दर्जा असून राज्यभर चांगल्या उपक्रमासाठी बुद्ध विहार ओळखले जाते. याचाच भाग म्हणून दिनांक २७ व २८ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.०० ते ०५.०० च्या दरम्यान बुद्ध विहारात दोन दिवशी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत उपाली थेरो नगर या ठिकाणी उपासक-उपासिकांसाठी शिबिर होणार आहे.

या शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून काळेगाव अहमदपूर जिल्हा लातूर येथील भदंत महास्तवीर उपस्थित राहणार आहेत पूर्णा शहरात प्रांजल हेतूने धावपळीच्या काळात दोन दिवसात धम्माची अधिकाधिक माहिती व्हावी व धम्मविण्यानुसार जीवन जगण्यासाठी आदर्श अशी प्रेरणा मिळावी यासाठी हे शिबिर सर्वांसाठी खुले आहे या शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. शिबिराची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी असेल शिबिरात सर्वांनी पांढरा पोशाख परिधान करून यावे लागेल शिबिरात सर्वांना अष्टशील उपसताचे पालन करावे लागेल सर्व शिवाय शिबिरार्थींना भोजन चहा पाणी याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक शिबिरार्थींनी येताना सोबत वही व पेन घेऊन यावे या शिबिरात अशिक्षित शिबिरार्थींना सुद्धा प्रवेश घेता येणार आहे. उपासक उपासिकांकरिता संस्कार शिबिर आयोजित केले आहे अशी माहिती संपर्कप्रमुख भंते पाय्यावंश यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या