🌟परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अशोकराव अंभोरे यांचा कार्यकर्त्यांसमवेत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश...!


🌟जिल्हा निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष ऍड.गोविंद दळवी,विभागीय प्रशिक्षक प्रा.डॉ.सुरेश शेळके यांच्या उपस्थितीत प्रवेश🌟 


भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय ऍड. प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समाजातील तळागाळातील लोकांना गोरगरीब गरजूनां न्याय मिळवून देण्यासाठी, अधिक मदत करण्यासाठी आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा समाजहित न्युज चॅनल चे संस्थापक संपादक, आपल्या सामाजिक कार्यातून संपूर्ण परभणी जिल्ह्याला सर्वश्रुत असलेले, उच्चशिक्षित, युवा पत्रकार, युवा नेतृत्व प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी बहुसंख्य कार्यकर्त्यांसमवेत वंचित बहुजन आघाडीत परभणी जिल्हा निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष ऍड. गोविंद दळवी, विभागीय प्रशिक्षक प्रा. डॉ. सुरेश शेळके, विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण, उत्तर परभणी जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. 

प्रमोद अशोकराव अंभोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शैक्षणिक संस्थे मार्फत वसतिगृह तसेच विविध दुर्गम क्षेत्रात मोफत कोचिंग क्लासेस घेऊन गोर, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करतात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना निःस्वार्थ मदत देण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करतात, तसेच जेव्हा केव्हा रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालय असो किंवा खाजगी रक्त पेठी असो येथून रक्त उपलब्ध करून मदत करत असतात, तसेच गोर गरीब गरजू लोकांना अन्नदान, मिठाई वाटप, महिलांना साडी वाटप असे अनेक समजोपोयोगी कार्य करून लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केला आहे. तसेच त्यांनी भिक्षामुक्त परभणी अभियान राबवून अनेक भिक्षावृत्ती करणाऱ्यांना भीक्षावृत्ती करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हेच कार्य मोठ्या उत्साहाने करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या समवेत दैनिक मुस्लिम समाज संघर्ष न्युज चे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते शेख इसाक, शंकर बनसोडे, रवि कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, शुभम कोरडे, सिद्धार्थ शिनगारे आदीं समवेत अनेकांनी प्रवेश केला आहे. सदरील प्रवेश सोहळा शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे परभणी महानगर अध्यक्ष रणजीत मकरंद, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, युवा शहराध्यक्ष प्रमोद कुठे, जिल्हा महासचिव शिवाजी वाकडे, माजी संघटक ए.जी. खंदारे यांच्यासह इतर प्रमुख आजी माजी पदाधिकारी उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या