🌟सायंकाळच्या आरतीनंतर मागील दहा दिवसांपासून चारशें ते पाचशें गणेशभक्त घेत आहेत महाप्रसाद अर्थात अन्नदानाचा लाभ🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील जिजाऊ नगरीतील जिजाऊ गणेश मंडळाने गणेशोत्सवाला आरंभ झाल्यापासू सतत दहा दिवस महाप्रसाद अर्थात अन्नदानाचा कौतुकास्पद उपक्रम राबवून अन्चाय गणेश मंडळांपुढे आदर्श निर्माण केला असून या महाप्रसाद अर्थात अन्नदानाचा मागील दहा दिवसांपासून प्रतिरोज सायंकाळच्या आरतीनंतर ४०० ते पाचशे श्री गणेशभक्त लाभ घेत आहेत.
जिजाऊ गणेश मंडळाच्या आरतीला देखील किमान दोनशे ते तीनशे महिला,बाळ गोपाळ,अबालवृद्ध असे गणेश भक्त आवर्जून उपस्थित राहत असल्याने या परिसरात अत्यंत भक्तीमय वातावरण निर्माण होत असून जिजाऊ गणेश मंडळाचे स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे याठिकाणी सेवा बजावतांना पहावयास मिळत आहेत....
0 टिप्पण्या