नांदेड - पत्रकारितेसोबतच सामाजिक व महिलांच्या उन्नती साठी जीवन समर्पित करून,संपूर्ण हयातभर सायकलवर भ्रमण करीत, ' माणुसकी ' जपत समाजहिताचे कार्य करणारे,इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली चे सल्लागार मंडळ सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी परभणी येथील जेष्ठ पत्रकार मदन (बापु) कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल ,स्वातंत्र्य सैनिक देवराव सोनकांबळे प्रतिष्ठान कल्लाळी ता.कंधार जि. नांदेड च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी लोकशिक्षक जी.प.हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भुजंग देवराव सोनकांबळे गुरुजी,स्वा.सैनिक देवराव सोनकांबळे प्रतिष्ठानच्या माजी अध्यक्षा तथा कल्हाळी ग्रामपंचायत सदस्या प्रेमला भुजंग सोनकांबळे, ग्रा. प.सदस्या कल्लाळी सौ. सीमा कीर्तीकुमार सोनकांबळे ,स्वा.सै.देवराव सोनकांबळे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष ॲड. कीर्तीकुमार सोनकांबळे, उपाध्यक्ष उत्तम कांबळे व प्रतिष्ठाण चे सर्व पदाधिकारी ॲड. पूजा सोनकांबळे ,सुरज सोनकांबळे, कु.सांची सोनकांबळे, देवराज सोनकांबळे व इतर प्रतिष्ठित मंडळी याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.
तसेच नांदेड येथील कंथक नगर मध्ये,ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे यांचा ,इंडियन आर्मी मधील रिटायर्ड ऑनररी नायब सुभेदार माधव किशन वाघमारे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किशनराव वाघमारे .सौ.अलका वाघमारे ,प्रबुद्ध वाघमारे, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती लाभली होती......
0 टिप्पण्या