🌟शेतकऱ्यांना कापूस,तूर,उडीद,मूग खरीप पिकांच्या नुकसान भरपाईबद्दल तात्काळ 25 टक्के विम्याची अग्रिम रक्कम देण्याची मागणी 🌟
परभणी (दि.30 सप्टेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस,तूर,उडीद,मूग आदी खरीप पिकांच्या नुकसान भरपाईबद्दल संबंधित पिक विमा कंपन्यांनी सर्वसामान्य तात्काळ 25 टक्के पिक विम्याची अग्रीम रक्कम वितरित करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी व शेतकर्यांनी परभणी ते मानवत या राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव फाट्यावर जोरदार रास्तारोको आंदोलन केले.
आमदार सुरेश वरपुडकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब रेंगे, प्रदिप सोनटक्के, कैलास टेकाळे, दिलीप साबळे, अजय चव्हाण, विनोद लोहगांवकर, रमेश लाड, प्रताप रेंगे, उमेश मिरखेलकर, कल्याण लोहट, सचिन लोहट, रऊफ खान पठाण, विलास देशमुख, कांतराव देशमुख, सुहास देशमुख, उमाजी घुंगरे, संतोष कणे, केशव घुले, देविदास बोबडे, भरत घुले, भागवत मोरे, प्रभाकर घुले, विनोद मोरे, भिमराव मोगले, श्रीकांत पाटील, जगन्नाथ गोरे, लिंबाजी गोरे, पंढरी तायनाथ, मधुकर काळदाते, गणेश शिराळ, अरुण टेकाळे, संदीप राऊत, शिवराज लोंढे, मनिष यादव, कदीर भाई मांडाखळीकर, सईद खान, रामदास बांबलेे, नाना दळवे, भगवान शिरसेवाड, अशोक सिरसेवाड, शिवाजी दंडवते, नारायण सोनटक्के, नागनाथ मेटे, श्रीधर पाते आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हास्तरीय समितीमार्फत स्वतंत्र आदेश काढूनही 25 टक्के अग्रीम पिक विमा भरपाईस टाळाटाळ होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तसेच संबंधित पीक विमा कंपन्यांच्या अधिकार्यांना पाचारण करीत प्रशासनाने या बाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली......
0 टिप्पण्या