🌟परभणीत राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन....!


🌟टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले🌟


परभणी (दि.24 सप्टेंबर 2024) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी आणि जिल्हा टेबल टेनिस असोशिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते झाले.


यावेळी खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी संजय कडू, परभणी जिल्हा टेबलटेनिस असोसिएशन सचिव गणेश माळवे, मधुकर लोनार, ज्ञानेश्वर पंडीत, चेतन मुक्तावार आदीं उपस्थित होते.

यावेळी खासदार संजय जाधव यांनी राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा परभणी जिल्ह्यात होत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगून विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी खेळामध्ये जय-पराभव महत्वाचा नसून खेळामध्ये सहभागी होणे महत्वाचे असल्याचे सांगितले. तसेच या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी खेळाडूवृत्तीने स्पर्धेचा आनंद घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

दि. 23 ते 26 सप्टेंबर, 2024 या कालावधीत चालणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यातील 8 विभागातील 54 संघांचे 470 खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या कुशल चोप्रा, निल मुळे, आद्या बाहेती यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या