🌟धाडसी कारवाईत एकुण २३ लाख २० हजार रुपयांचा माल व ट्रकचालकास घेतले ताब्यात🌟
नांदेड (दि.११ सप्टेंबर २०२४) :- नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारी विरोधात विशेष पथके तयार करुन ऑफरेशन प्लॅश आउट नुसार पथकातील अधिकारी व अमंलदार यांना अवैद्य धंद्यांवर कार्यवाही करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते.
त्यावरुन काल मंगळवार दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अबिनाशकुमार यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुन देगलुर ते उदगीर रोडवर मौजे कारेगांव येथे एक आयशर वाहन क्रमांक एम.एच २६ बिडी ८०५१ वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात गहु व तांदळाने भरलेले ११५ कट्टे किंमत अंदाजे ०१ लाख २० हजार रुपयांचा रेशनचा माल मिळुन आला. त्यावरुन सदर ट्रक क्रमांक एम.एच २६ बिडी ८०५१ किंमत अंदाजे २२ लाख रुपये व ट्रकमध्ये असलेला मुद्देमाल किंमत अंदाजे ०१ लाख २० हजार रुपये असा एकुण २३ लाख २० हजार रुपयांचा माल व ट्रकचालकास ताब्यात घेउन पोलीस स्टेशन देगलुर येथे हजर करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागवुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तविज ठेवली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनी श्री.व्ही.एस. आरसेवार, पोह/६०५ पोतदार, पोह/३३५ मुंढकर,पोना/५८० तलवारे, पोका २८६४ येंगाले, पोकॉ/२६१४ वाघमारे यांनी पार पाडली. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.......
0 टिप्पण्या