🌟 राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडली....!


🌟उपचारासाठी पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणलं🌟 

✍️ मोहन चौकेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  छगन भुजबळ यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आलं आहे. त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांना नेमका काय त्रास झाला? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यांना बॉम्बे हॉस्पिलटला दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्षात आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींना वेगवेगळ्या शहरांचा दौरा करावा लागत आहे. काही ठिकाणी बैठकांसाठी जावं लागतं. तर काही ठिकाणी सभा, प्रचार सभा किंवा इतर कार्यक्रमांसाठी नेते मंडळी आणि मंत्र्यांना जावं लागतं. यामुळे होणारा सातत्याचा प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. भुजबळ यांना नेमका काय त्रास होतोय? याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. पण त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या हिंतचिंतकांकडून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.....                          

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या