🌟पुढील चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेचा एनकाउंटर झाला का ? विरोधकांचा सरकारला सवाल🌟
* बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा एनकाउंटर, पोलिसांची बंदूक हिस्कावून अक्षय कडून गोळीबार, स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी झाडल्या तीन गोळ्या.
* बदलापूर अत्याचार प्रकरणामधला आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश.
* पुढील चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेचा एनकाउंटर झाला का ? विरोधकांचा सरकारला सवाल
* अक्षयला पोलिसांनी ठरवून मारलं पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट धादांत खोट आरोपी अक्षय शिंदेच्या पालकांचा आरोप.
* आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाउंटर नंतर बदलापूर मध्ये फटाके फोडले, बदलापूर मधल्या काही महिलांकडून पेढ्यांच वाटप करून आनंद साजरा.
* जवळपास दोन कोटी महिलांना 29 सप्टेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता.
* कॅबिनेट नंतर आदिती तटकरे यांची माहिती. छानणीमुळे विलंब झालेल्या महिलांना यंदा पैसे मिळणार.
* मनोज जरांगेंना समर्थन देणाऱ्या संभाजी राजेंवरती ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची आग पाकड तर मनोज जरांगेंना काहीही झाल्यास सरकार जबाबदार संभाजी राजेंचा हल्लाबोल
* एकनाथ खडसे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे,गिरीश महाजनांचे ओपन चॅलेंज, एक खोट लपवण्यासाठी एकनाथ खडसे चार खोट बोलत असल्याची गिरीश महाजनांची टीका
*सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार; मंत्रिमंडळाचे धडाकेबाज ; ब्राह्मण समाजाची प्रलंबित मागणी सरकारकडून मान्य, परशुरामांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती
* लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती, छाननीमुळं विलंब लागलेल्यांनाही मिळणार तिन्ही हप्त्यांची रक्कम
* शरद पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आज कोकण दौऱ्यावर; नितेश राणेंची भाषा शरद पवारांनाही खटकली, थेट प्रहार करत म्हणाले, "सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागतं"
* कट्टर हिंदुत्त्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा; अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती ; राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याच्या बातम्या कपोलकल्पित, शेलार-बावनकुळे-सुनील तटकरेंची प्रतिक्रिया तर हा महायुतीचा अंतर्गत मामला, शरद पवारांची प्रतिक्रिया
* मनोज जरांगेंना काही झाल्यास सरकार आणि विरोधक जबाबदार ; मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळावरून संभाजीराजेंचा सरकारला इशारा ; मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला राजे बोलायला लाज वाटते, तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल ; मी ओरिजनल मराठ्यांच्या औलादीचा, मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत; मनोज जरांगे भडकले
* एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा जीआर काढण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन, कोल्हापूर,सोलापूर,परळी,परभणीमध्ये, बारामतीत रास्ता रोको ; सोलापूर-धुळे महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला, मराठा आंदोलक मनोज जरागेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको
* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाचपाखाडीत मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत, अभिजीत पानसेंच्या नावाचा अहवाल राज ठाकरेंना प्राप्त ; राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक; दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीवर जोरदार तर्कवितर्क
* मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मतदान उद्याच होणार, सुप्रीम कोर्ट आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी करणार
* कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये सापडली बेवारस बॅग, बॅगेत मिळाले 20 लाख रुपये आणि औषधांचा बॉक्स, बॅगेच्या मालकाचा पोलिसांकडून शोध
* लापता लेडीज चित्रपटाची ऑस्करच्या शर्यतीसाठी निवड, 29 चित्रपटांमधून निवडला किरण रावचा चित्रपट
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या