🌟पुर्णा तालुक्यातील पत्रकारीता क्षेत्रातील दिपस्तंभ जेष्ठ पत्रकार रमेश गायकवाड.....!


🌟महापुरुषांचा समाज सुधारकांचा समाज परिवर्तनाचा विचार त्यांच्या निर्भिड निष्पक्ष पत्रकारीतेतून निदर्शनास येतो🌟

✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व :- श्रीकांत हिवाळे सर 

पुर्णा येथील निर्भीड निरपेक्ष ज्येष्ठ पत्रकार आदरणीय रमेश गायकवाड यांचे पत्रकारितेतील साडेतीन दशका तिल योगदान काळाच्या कसोटीला उतरलेलं आहे आंबेडकरी व धम्म चळवळीचे प्रबोधन व परिवर्तन चळवळीचे समृद्ध पार्श्वभूमी परिवारातून ते आले आहेत सामाजिक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा समाज सुधारकांचा समाज परिवर्तनाचा विचार आपल्या पत्रकारितेच्या जीवनामधला अविभाज्य भाग बनवून तीन दशकापेक्षाही जास्त वृत्तस्तपणे  ते पत्रकारिता करत आहेत भारतीय दलित पॅंथर चळवळीच्या मुशीतून पाहून तुला फोन निघालेलं त्यांचं व्यक्तिमत्व आजही त्यांच्या पत्रकारितेला पॅंथर विचाराची धार असते मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे म्हणून जो रोमहर्षक लढा उभा राहिला त्या लढा मध्ये ते प्रत्यक्ष सहभागी झाले. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नामांतर लढ्यावर वेळोवेळी प्रकाश टाकला नामांतराच्या बाजूने जनमत निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका त्यांची होती. 

मराठवाड्या चे भूमिपुत्र भारतीय दलित पॅंथर चळवळी मधून पुढे आलेल उच्चशिक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व रिपाई  डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार दिवंगत टी एम कांबळे संभाजीनगर येथील तत्कालीन पॅंथर नेते जिल्हा परिषदेचे सभापती रमेश दादा गायकवाड पूर्णा येथील भारतीय दलित पॅंथरचे मराठवाडा पातळीवरील ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे संभाजीनगर येथील रतन कुमार पंडागळे नांदेड  येथील जेष्ठ  आंबेडकरी विचार वंत दिवंगत एस एम प्रधान त्यांच्यासोबत  चळवळीमध्ये काम केले.

वर्तमानपत्रांमध्ये अनेक नामांकित वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी आदर्श पत्रकारिता केली1995 मध्ये त्यांनी काळाची हाक नावाचं साप्ताहिक काढलं आंबेडकरी व परिवर्तन चळवळीचे मुखपत्र म्हणून या वर्तमानपत्राकडे पाहिल्या जायचे या साप्ताहिकाच्या प्रकाशन प्रसंगी संभाजीनगर येथून मोठ्या प्रमाणावर त्यानंतर चळवळीमध्ये अग्रणी नेते आले होते दिवंगत आमदार आदरणीय टी एम कांबळे साहेब यांच्या हस्ते या साप्ताहिकाच्या अंकाचे प्रकाशन झाले होते.

दरवर्षी ते न चुकता दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असतात पूर्णा तालुक्यातील व परभणी जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरिव कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींच्या कार्याविषयी यथोचित प्रकाश टाकण्याचे काम ते करत असतात. पत्रकारितेमध्ये कार्य करत असताना अधिकारी लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य जनता यांच्यामध्ये योग्य तो समन्वय ठेवून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

आदरणीय रमेश गायकवाड स्वभावाने निगर्वी निरामय निरपेक्ष आहेत. आज त्यांचा वाढ दिवस या मंगल दिनी त्यांना व कुटुंबीयांना आयु,आरोग्य बल वैभव धन संपदा प्राप्त होवो ही मनोकामना...!

पौर्णिमेच्या शीतल आल्हाददायक चंद्रमा प्रमाणे त्यांच आयुष्य प्रकाशमान होवो ही सदिच्छा...!

शुभेच्छुक

श्रीकांत हिवाळे सर 

मा.तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा 

ॲड.हर्षवर्धन गायकवाड

 उद्योजक तथा मा.आरोग्य सभापती

नगर परिषद पूर्णा जिल्हा परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या