🌟कार्यक्रमास प्रसिद्ध समई नृत्यकार मधुकर कांबळे व त्यांच्या संचाने आपल्या गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली🌟
परभणी (दि.१५ सप्टेंबर २०२४) दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणीच्या वतीने दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई निकुंभ, मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड, परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक व परभणी जिल्हा युवा अध्यक्ष अमित भाई भालेराव यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव निमित्त दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कार्यक्रमास प्रसिद्ध समई नृत्यकार मधुकर कांबळे व त्यांचा संचाने आपल्या गीतांच्या माध्यमातून व नृत्यांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुभाष जोंधळे, ऍड.सोनी आदींची उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग टाक, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, युवा जिल्हाध्यक्ष अमित भाई भालेराव, सुमित भाऊ भालेराव, युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शिंदे पाटील,महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पंचांगे, जिल्हा विधी सल्लागार ऍड. राम वैराळे, ऍड. महेंद्र काळे, पत्रकार विंग चे जिल्हा संघटक हरदीप सिंग बावरी, पत्रकार विंग जिल्हा सल्लागार, पत्रकार विंग परभणी शहर अध्यक्ष प्रशांत वाटूरे, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष रमेश घनघाव, शहर उपाध्यक्ष कैलास भाई पतंगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेख अझहर, सदस्य कलीम भाई, संदीप वायवळ, सचिन हटकर, सिद्धार्थ खाडे सागर गवरे, विकास ससाणे, संतोष जैस्वाल मुजीब खुरेशी, भुजंग खंदारे, भारत वायवळ, राघोजी कुरवारे, सूरज, गायकवाड पवन कौसडीकर आदींनी परिश्रम घेतले होते.
यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.......
0 टिप्पण्या