🌟पुर्णेतील शिक्षक तथा कवी डी.सी.डुकरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार जाहीर.....!


🌟छत्रपती संभाजीनगर येथील नागरी विकास सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्काराची घोषणा🌟 

     शिक्षक चळवळीतून उदयाला आलेलं राज्य पातळीवरील बहुआयामी शिक्षक नेतृत्व,इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक,अनेक जिल्हा प्रशिक्षणातील इंग्रजी विषय प्रशिक्षक,वैशाखवणवा काव्यसंग्रहाचे संवेदनशील कवी,सामाजिक कार्यकरते,परभणी जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष,राज्य मुख्याध्यापक महासंघाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष डी.सी.डुकरे यांना नुकताच छत्रपती संभाजीनगर येथील नागरी विकास सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्य स्तरीय आदर्श शिक्षक सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला.सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एल.बी.ताटू यांनी लेखी पत्राद्वारे डी.सी.डुकरे यांना कळवले आहे.

   यापूर्वी डी.सी.डुकरे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीडचा राजे यशवंतराव होळकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार,राजे मल्हाराव होळकर श्री गणेश मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार,मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांच्या 'आई' कवितेला मुक्ताई फाऊंडेशन बारामतीचा राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार,त्यांच्या कवितेला माजी आमदार दगडुजी गलांडे समिती कलावतीबाई काळे वाचनालय हाताळा जिल्हा हिंगोलीचा राज्यस्तरीय सर्व तृतीय पुरस्कार,त्यांच्या वैशाखवणवा काव्य संग्रहास बिरसा मुंडा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी शिक्षण संस्था धनगर टाकळी ता.पुर्णा,परभणी जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशन,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ व राज्यातील विविध क्षेत्रातील त्यांच्या असंख्य मित्रांकडून अभिनंदन केले जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या