🌟नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य व माजी नगरसेवक सरदार बरियामसिंग नवाब यांचे निधन....!

 


🌟महानगर पालिकेचे मा.नगरसेवक स.गुरमीत सिंघ उर्फ डिंपल सिंघ नवाब यांचे ते वडील होते🌟 

नांदेड :- नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य तथा नांदेड महानगर पालिकेचे माजी नगरसेवक स.बरियामसिंग राजसिंग नवाब यांचे काल रविवार दि.०१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले शेवटच्या वेळी त्यांचे वय ७७ वर्षे होते.  

नांदेड महानगर पालिकेचे माजी नगर सेवक सरदार गुरमीत सिंग नवाब उर्फ डिंपल सिंघ,समाजसेवक स.बलबीर सिंघ नवाब आणि स.गुलबीर सिंघ यांचे ते नवाबचे वडील होते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या निधनामुळे स्थानिक सिख समाजात शोककळा पसरली आहे.  गुरुद्वारा बोर्ड सदस्य आणि प्रशासन समिती सदस्य म्हणून त्यांनी दिर्घकाळ काम केले होते ते बीदर येथील गुरुद्वारा नानक झिरा साहेब ट्रस्टचे आजीवन सदस्य आणि गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य होते ते श्री गुरु नानकदेवजी अभियांत्रिकी महाविद्यालय समिती, बिदरचे उपाध्यक्षही होते त्यांच्या पश्चात तीन मुल,सात मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार, दि.०२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता गोदावरी नदीच्या काठावरील नागिंगघाट स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या