🌟परभणी जिल्ह्यातील महत्त्वाच्या 'लोकल अपडेट्स' बातम्या.......!


🌟परभणी जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासन कुंभकर्णी झोपेत ? जिल्ह्यात सर्वत्र भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री 🌟

💫 परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातल्या झरी शिवारात काल मंगळवार दि.२४ सप्टेंबर रोजी विज पडून दोन तरुण शेतमजूरांची दुर्दैवी मृत्यू.

💫 परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरातील 'शिवतीर्थावर' आज २५ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाकडून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ झालेले बोंबाबोंब आंदोलन यशस्वी. 

💫 परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरातील लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने पतसंस्थेतील पिग्मी एजंट विरोधात चक्कं पत्रक काढीत संबंधित 'पिग्मी एजंट' सोबत कसल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार न करण्याचे केले आवाहन.

💫 परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील असंख्य भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलले : अनेक भगिनींच्या बॅंक खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ताही जमा.

💫 परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरासह तालुक्यात आज बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वरुन राजांचे आगमन : जोरदार पाऊसाची सुरुवात.

💫 परभणीतील श्री.शिवाजी महाविद्यालयातील बॉक्सिंग चॅम्पियन सुमित कानडे यांनी बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक : बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल सुमित अनिल कानडे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.

💫 परभणी जिल्ह्यात गौरी/गणपती/ईद सन उत्सवात शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतून 'आनंदाचा शिधा' अदृष्य झाल्याने असंख्य शिधापत्रिका धारकांच्या आनंदावर पडले विरजण ? मागील एप्रिल महिन्यातील गुढीपाडवा/रमजान ईद/भिम जयंती या सन उत्सवात देखील देखील 'आनंदाचा शिधा/ साड्यांचे' लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या आचारसंहितेमुळे वाटप टळले मग 'आनंदाच्या शिध्यावर' कोणी केला आनंदोत्सव साजरा ? जनसामान्यांना पडला प्रश्न.

💫 परभणी जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासन कुंभकर्णी झोपेत ? जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यात सर्वत्र भेसळयुक्त खाद्यतेल/तुपासह अन्य मानवी आरोग्यास घातक पदार्थांची मनमानी दराने खुलेआम विक्री.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या