🌟मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी केले उपोषणासह रास्तारोको आंदोलन🌟
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील मराठा युवकांनी आमरण उपोषण व रास्तारोको करत मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठींबा दिला आहे यावेळी रास्तारोको दरम्यान तहसीलदार प्रशांत सागडे यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी या निवेदनात आरक्षणाची सगे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी , हैदराबाद गॅझेट यासह इतर मागण्यांसाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर मराठा युवकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने मंजुर कराव्यात अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रशांत सागडे व शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देऊन जवळ पास दोन तास वाहतूक बंद होती जवळपास एक दीड किलोमीटर वाहनाच्या लागल्या होत्या मराठा योद्धा चंद्रकांत महाराज लबडे रामजी शिदोरे राजेंद्र आढाव अशोक दिवटे यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे व. उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पांथरी.पंचायत समितीचे सभापती तथा प्रगतिशील शेतकरी सदाशिवराव थोरात सुरेश राव वाकणकर भानुदास राव सवराते जनार्धन आवरगंड पत्रकार लक्ष्मीकांत जवळेकर.स्वामी. आदींनी भेट दिली व आपला पाठिंबा उपोषणाला जाहीर दिला
0 टिप्पण्या