🌟पुर्णा तालुक्यात रिलायबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखान्यात जनावरांसह माणसातील माणुसकीचीही कत्तल ?


🌟स्थानिक कामगारांना डावलून गुत्तेदारी पध्दतीने भरती केलेल्या शेंकडों परप्रांतीय कामगारांचे आर्थिक मानसिक सोशन🌟 

परभणी (विशेष वृत्त) :- परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या कानडखेड शिवारात रिलायबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तलखान्यात प्रतिरोज शेकडो निष्पाप दुधात/गाभन (गरवार) म्हशी,म्हशींची वडार,हाले आदी जनावरांसह स्थानिक कामगारांना डावलून बेकायदेशीररित्या गुत्तेदारी पध्दतीने भरती केलेल्या शेंकडों परप्रांतीय कामगारांचे आर्थिक मानसिक शारीरिक सोशन करीत माणसातील माणुसकीची राजरोसपणे कत्तल केली जात असतांना प्रशासकीय व्यवस्था सुस्तावलेल्या म्हशी प्रमाणे रिलायबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखाना प्रशासनावर असंख्य तक्रारीनंतर देखील कठोर कारवाई करण्यास का धजावत नाही ? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून स्थानिक प्रशासनासह जिल्हास्तरीय प्रशासनातील अधिकारी देखील रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनी विरोधात आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवून संबंधित कंपनी प्रशासनाच्या रझाकारी दडपशाहीला मिळालेल्या कागदी गांधींच्या बदल्यात सत्कारुपी 'गांधी टोपी' घालून साक्षात सलामी देत असल्यामुळे संबंधित कंपनी प्रशासन कमालीचे मुजोर झाल्याचे निदर्शनास येत असून कामगार हक्क कायद्याला वेळोवेळी पायदळी तुडवीत आहे.

देशातील शासकीय/प्रशासकीय व खाजगीस्तरावरील सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने चालवला जात असतांना मात्र रिलायबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखान्यातील शेंकडों कामगारांचे मासिक वेतन लेबर कॉन्टॅक्टर अर्थात कामगार पुरवठा करणाऱ्या गुत्तेदाराच्या माध्यमातून ऑफलाईन पध्दतीने करुन त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक/मानसिक सोशन केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालणाऱ्या या कत्तलखान्यात नियमबाह्य पद्धतीने मानवी जिवनात उपयुक्त असलेल्या दुधावरील तसेच गाभन व म्हशींच्या वगार आदी जनावरांची क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते रोज असंख्य वाहनांतून जनावर कत्तलीसाठी कंपनीत आणली जातात या जनावरांची कुठल्याही प्रकारची रितसर नोंदणी/दाखल्यांची चौकशी तसेच वैद्यकीय तपासणी न करता त्यांची कत्तल करुन मांसाची पॅकींग करुन हे डबाबंद मांस विदेशात पाठवले जाते या कंपनीत शासकीय नियमानुसार जवळपास ८० टक्के कामगार स्थानिक असायला हवे परंतु स्थानिक कामगारांचे मौलिक अधिकार डावलून रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखाना प्रशासनाने गुत्तेदार अर्थात दलालांच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने पश्चिम बंगाल,आसाम, काश्मीर,उत्तर प्रदेश,नेपाल/सिक्कीम,उत्तराखंड अशा परप्रांतीय ९८८ कामगारांची कंपनीत भरती केली आहे.

रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखान्यातील बुचड (डिबोटींग) विभागात पश्चिम बंगाल की बांगला देश ? येथील १२० कामगार असून यातील अनेकांनी स्थानिक दलालांना हाताशी धरुन येथील बोगस आधारकार्ड देखील बनवून घेतले असल्याचे समजते तर जनावरांच्या कत्तल (सलाटर) विभागात जवळपास ४२ कामगार विदर्भातील अकोला येथील असल्याचे बोलले जात असले तरी चौकशीअंती सदरील कामगार नेमके आहेत तरी कुठले याचा शोध निश्चितच लागेल तर जनावरांच्या मांसाची प्रेस पॅकींग विभागात महिला/पुरुष असे जवळपास १२० कामगार असून यात बंगाल/नेपाल/कश्मिर येथील कामगारांचा भरणा करण्यात आला आहे पंचरुम विभागात जवळपास ६० कामगार असून सदरील कामगार आसाम/पश्चिम बंगाल राज्यातील आहेत तर सुरक्षा व्यवस्थेची जवाबदारी सांभाळणाऱ्या संरक्षण विभागात २० ते २५ कामगार असून यात बरेच काश्मीरी व काही महाराष्ट्रीयन कामगार आहेत तर सफाई विभागात ०७ कामगार असल्याचे समजते तर सिलस डिपार्टमेंट मध्ये ४० कामगार असून हे देखील परप्रांतीय आहेत या कामगारांसाठी कंपनीत खानावळ (कॅन्टीन) या खानावळीत कामगारांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे चरबीयुक्त जेवन व तेही नगदी स्वरुपात दिले जाते त्यामुळे अनेक कामगारांना टायफाईड/काविळ सारख्या जिवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत असून संबंधित खानावळ चालक कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याशी जिवघेणा खेळ खेळत असत्याचे कामगारांतून बोलले जात असून मागील महिन्यात पश्चिम बंगाल राज्यातील एका २५ वर्षीय कामगाराला काविळ आजार जोडल्याने कंपनीतच आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्याचे बोलले जाते संबंधित कामगारांकडून नियमबाह्य पद्धतीने रात्रंदिवस काम करुन घेतले जाते परंतु त्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला अर्थात टिए/डिए देखील दिले जात नाही याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे त्यांचे मासिक वेतन त्यांचा बॅंक खात्यावर जमा न करता कामगार पुरवठा गुत्तेदार अर्थात दलालांच्या खात्यावर जमा केले जाते तेही अवेळी त्यामुळे अनेक कामगार पुरवठा गुत्तेदार अर्थात दलाल कामगारांच्या मासिक वेतनाचे लाखो रुपये घेऊन पसार झाल्याच्या घटना सातत्याने कंपनीत घडतांना निदर्शनास येत असून परप्रांतीय कामगारांचे आर्थिक मानसिक शारीरिक सोशनास ज्याप्रमाणे कामगार पुरवठा गुत्तेदार अर्थात दलाल जवाबदार आहेत त्याहीपेक्षा जवाबदार संबंधित कंपनी प्रशासन देखील आहे असे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालणारे कत्तलखाना प्रशासन राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देऊन संबंधित परप्रांतीय कामगारांच्या त्यांच्या ओरिजनल आधारकार्डासह रितसर नोंदी घेऊन या संदर्भात स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला माहिती देते का ? हा प्रश्न देखील उपस्थित होत असून कंपनी प्रशासनासह स्थानिक प्रशासनाचे निष्क्रिय धोरण एक दिवस निश्चितच आत्मघातकी ठरु शकते असे मत जानकारांतून व्यक्त होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या