🌟मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी.....!


🌟पूर्णा तालुक्यातील अनेक गावातून निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी🌟 

पुर्णा (दि.२१ सप्टेंबर २०२४) :- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली (सराटी)  या ठिकाणी दि.१७ सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणास पाच दिवस उलटले तरी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही.

 गेल्या वर्षभरात त्यांनी वेगवेगळी  उपोषणे केली त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस हे खालावत आहे. त्यांच्या जीवीत्वाला धोका असून शासन याची कोणतीही दखल घेत नाही यासाठी शासनाने उपोषणाची दखल घेऊन आरक्षणाचा प्रश्न आणि तसेच उपोषण सोडवावे अन्यथा पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांचा रोष बाहेर येईल असे निवेदन तालुक्यातील ,माटेगाव, आहेरवाडी लिमला,गौर,कंठेश्वर, ममदापूर, पिंपळगाव (बा), कौडगाव, फुकटगाव,कान्हेगाव, आदी गावातील सकल मराठा समाजातील स्त्री-पुरुष लहान मुले मुली यांनी पूर्णा तहसीलदार यांना त्या त्या गावातील ग्रामसेवक तलाठी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या