🌟मंगरुळपीर येथील सागर गुल्हाने यांनी साकारला'बाप्पाचा' आगळावेगळा देखावा......!


🌟भारतीय कंपन्याना भरभराटीचे दिवस आल्याचे दर्शवले🌟


फुलचंद भगत

वाशिम:-काळाच्या ओघात भारतीय कंपन्या जरी मागे पडलेल्या दिसत असल्या तरी त्यांचे महत्व माञ कमी झालेले नाही.सध्या यांना भरभराटिचे दिवस येथील असा महत्वपुर्ण संदेश देणारा गणपती बाप्पाचा आगळावेगळा देखावा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील प्रसिध्द खेळाडु सागर गुल्हाने या युवकाने साकारला आहे.हा देखावा पाहण्यासाठी परिसरातुन लोक गर्दी करत आहेत.

           फोन मध्ये क्रांती करणाऱ्या बीएसएनएलची परिस्थिती काही दिवसांपूर्वी लयास गेली होती तर पोस्ट ऑफिस सुद्धा इंटरनेटच्या सुविधेपुढे मागे पडले होते,मात्र. याचं महत्त्व कमी झालेलं नाही.काळ गाजवलेल्या या दोन्ही भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण कंपन्या आज काळाच्या ओघात मागे जरी पडल्या असल्या तरी  याचे महत्त्व कमी झालेलं नसून बीएसएनएल पुन्हा मागणी वाढली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात भारतीय डाकघर सुद्धा उभारी घेईल म्हणून मंगरूळपीरच्या सागर गुल्हाने यांनी आपल्या गणेश उत्सवाच्या देखाव्यातून बीएसएनएल व भारतीय डाकघर तसेच इंडियन आॅईल यांच्या प्रतिकृती उभारून पुन्हा या कंपन्यांना भरभराटीचे दिवस येतील याच शुभेच्छा रुपी बाप्पाच्या देखाव्यातून साकारली आहे.भारतीय कंपन्यांना पुन्हा भरभराटीचे दिवस येतील हाच संदेश या देखाव्यातून दिला आहे......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या