🌟पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे🌟
परभणी (दि.19 सप्टेंबर 2024) : शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, इ. 9 वी 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, 5 वी ते 7 वी आणि इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आदी सर्व योजनांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाडीबीटी प्रणालीची https://prematric.mahait.org/Login/Login ही लिंक असून, मुख्याध्यापकांनी लॉग इन आयडी तयार करावी. महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांच्या अर्ज नोंदणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass7123 टाइप करून लॉग इन करावे. शाळेचे प्रोफाईलमध्ये शाळा, मुख्याध्यापक व लिपिकाची माहिती अद्ययावत करावी. विद्यार्थी प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी. योजनेची निवडीमध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करावी. या योजनांचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ 100 टक्के अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन संबंधित सर्व शाळेच्या मुख्यध्यापकांना जिल्हा समाज कल्याण आधिकारी यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या