🌟विविध महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.....!



🌟अधिक महितीसाठी जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थाक एस.आर.बडगुजर यांनी केले🌟

परभणी (दि.25 सप्टेंबर 2024) :  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या),राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ मर्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रु 10 लक्ष (बँकमार्फत), गट कर्ज व्याज परतावा योजना 50 लक्ष (बँकमार्फत) योजनेचे उदिष्ट प्राप्त झालेले आहे. या दोन्ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जात असून अर्जदारानी  VJNT.IN या बेबप्रणालीवर अर्ज मागविण्यात येत आहे.       

25 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत महामंडळाचा सहभाग 25 टक्के  यास (महामंडळाची नियमावली राहील.) राष्ट्रीयकृत बँक सहभाग 75 टक्के (बँकेची नियमावली राहील) असे एकूण रु.5 लक्ष  असून योजनेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. तसेच 1 लक्ष  थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळाचा सहभाग 100 टक्के असून यास महामंडळाच्या नियमानुसार कर्ज प्रकरणांसाठी जिल्हा कार्यालयात 25 सप्टेंबर, 2024 रोजी पासून अर्ज वाटपास सुरुवात करण्यात येणार असून या चार योजना महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गातील नवउद्योजक अनुभवी तरुण/ तरुणींनी अर्जासाठी स्वत: जातीचा दाखला व आधार कार्डची मुळ प्रती सोबत घेवून अधिक महितीसाठी जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थाक एस.आर.बडगुजर यांनी केले आहे.....

*-*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या