🌟या बैठकीस आम आदमी पार्टीचे नेते स.नरेंद्रसिंघ यांनी शाहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟
नांदेड :- नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने महान क्रांतीकारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील लोहा तालुक्यातील किवळा येथे सहविचार बैठक काल शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने शाहिद सरदार भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या बैठकीस आम आदमी पार्टीचे नेते सरदार नरेंद्रसिंघ जिल्हाध्यक्ष ॲड.जगजीवन भेदे,डॉ.अवधूत पवार यांनी मार्गदर्शन केले असून या कार्यक्रमास संग्राम गिते निळकंठ पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी किंवळा टेळकी वडगाव बोरगाव परिसरातील असंख्य कार्यकर्ते यांनी पक्षात प्रवेश केला व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते....
0 टिप्पण्या