🌟मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे परभणी जिल्ह्यात आयोजन......!


🌟गरजू लाभार्थ्यांनी http://cmykpy.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे🌟

 परभणी (दि.23 सप्टेंबर 2024) : राज्यामध्ये युवकांना नोकरी, व्यवसायासाठी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 30 सप्टेंबर 2024 दरम्यान मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित केले असून, परभणी येथे 30, पूर्णा येथे 26 व 27, सोनपेठ येथे 25 व 30, सेलू, पालम व गंगाखेड येथे 25 व 27, जिंतूर येथे 27 सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यात निवड होणाऱ्या 12 वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना 6 हजार, आयटीआय किंवा पदविकाप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना 8 हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना 10 हजार दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. शिक्षण सुरु असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत. तरी गरजू लाभार्थ्यांनी http://cmykpy.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून सहभागी होण्याचे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या