🌟प्रहार जनशक्ती पक्षा कडून पालकमंत्र्यांच्या फोटोला सडक्या सोयाबीन झाडांची माळ घालून निषेध व्यक्त🌟
(यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व पोलिसांमध्ये उडाली शाब्दिक चकमक)
परभणी - परभणी जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील नागरीकांचे स्थावर मालमत्तेचे व पशुधनाचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा परिस्थीतीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने संजयजी बनसोडे हे जिल्ह्याकडे फिरकले पण नाही. यांच्या या अकार्यक्षम व असंवेदनशील वर्तवनुकीचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत पक्षाच्या वतीने पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रतिमेला अतिवृष्टी मध्ये सडलेल्या सोयाबीनच्या झाडांची माळ घालून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पालकमंत्री निषेध करण्यात आला तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
अतिवृष्टीला १० दिवस उलटून गेले असून अद्यापही पालकमंत्री एकदा ही जिल्ह्यात आले नाही. पालकमंत्री हे फक्त जिल्हा नियोजन समितीच्या कामाचे टक्केवारी घेण्यापुरताच मर्यादीत राहीले आहे. असा आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. आ. बच्चुभाऊ कडू हे पाचशे किमी वरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी परभणीला आले व मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या आक्रमक भुमिकेमुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. परंतू पालकमंत्र्याला ८० किमी अंतरावर जिल्ह्यात येण्यासाठी वेळ भेटला नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
संजयजी बनसोडे यांच्या सारख्या अकार्यक्षम व असंवेदनशील व्यक्तीला पालकमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. करीता संजयजी बनसोडे यांना पालकमंत्री या पदावरुन कमी करून त्यांना बिनकामाचा मंत्री म्हणून त्यांचा नव्याने शपथविधी घ्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एका निवेदना द्वारे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर, माऊली गरुड, मुंजा गरुड, संदीप राऊत, शेख असलम, शेख सुभान,अमृत देशमुख, कृष्णा कांडे, वामन गरुड, शेख अजीज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या