🌟आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी डॉक्टरांना घातली भावनिक साद🌟
नांदेड (दि.22 सप्टेंबर 2024) - माझ्या यशामध्ये डॉक्टर मंडळींचा मोलाचा वाटा आहे. मी यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पद मिळवू शकले नाही. याची मला खंत आहे. पण मी डगमगणार नाही. तुम्ही मला जगण्याची उर्मी द्या. भविष्यात मी निश्चित पदक मिळविन असे आत्मविश्वासात्मक उद्गार आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू तथा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी यापदी निवड झालेली भाग्यश्री जाधव हिने शनिवारी येथे बोलताना काढले.
नांदेड शहरातील महावीर कॉलनी येथील नारायणा सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटलच्या सभागृहात नारायणा फाऊंडेशन, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरोपिस्टस वुमनसेल नांदेड, रोटरी क्लब नंदीग्राम, निनाद फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर नांदेड या पाच सेवाभावी संस्थांच्यावतीने एका नेत्रदिपक सोहळ्यात भाग्यश्री जाधव हिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ती बोलत होती. या सोहळ्यास हैद्राबाद येथील ॲपोलो हॉस्पिटलमधील निष्णांत हृदयरोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ.गोपालकृष्ण गोखले यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना ती म्हणाली की, माझ्या जीवनात सतत संघर्ष माझ्या वाट्याला आला पण मी कधीच डगमगले नाही. जिद्दीच्या जोरावर मी सतत प्रयत्नवादी राहिले. त्यामुळेच मला यश प्राप्त होत राहिले. माझ्या क्रीडा प्रवासात माझे मानस बंधू वरिष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व खंबीर साथ लाभली. त्यांच्यामुळेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्या यशामध्ये माझ्यावर निशुल्क उपचार करणारी डॉक्टर मंडळी, प्रसार माध्यमातील सर्व मान्यवर, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे बहुमूल्य योगदान आहे. यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत मला पदक मिळविता आले नाही. त्यामुळे संबंध देशवासियांची घोर निराशा झाली. याची मला खंत आहे. पण पराभवामुळे मी खचून जाणार नाही. तुम्ही मला जगण्याची उर्मी द्या मी आगामी काळात निश्चितपणे पदक मिळविन अशा शब्दांत भाग्यश्री जाधव हिने आत्मविश्वास व्यक्त केला.
प्रारंभी नारायणा फाऊंडेशनच्यावतीने मुंबई येथील प्रसिध्द बालरोग न्यूरो सर्जन डॉ.अनायता हेगडे, प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ.व्यंकटेश काब्दे,डॉ.विजय मिसाळे,डॉ.अजित काब्दे, डॉ.अदिती काब्दे, डॉ.पंकज राठी,डॉ.चैतन्य येरावार, डॉ.भट्टड, डॉ.कैलास कोल्हे,डॉ. निहाल, डॉ.गोरे, डॉ. बोंडले, डॉ.काळे, डॉ.वानोळे, डॉ.अश्वीन कोरे, डॉ.झडते, डॉ.योगेश्वरी मिसाळे, डॉ.साबू, डॉ.प्रेरणा येरावार,डॉ. शुभांगी पाटील यांनी भाग्यश्री जाधवचा फेटा,शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरोपिस्टस् वुमनसेल नांदेडच्यावतीने मुंबई येथील प्रसिध्द डॉ.आशा चिटणीस, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.शुभांगी पाटील,डॉ.प्रणव भोसले, डॉ.वर्षा गोरे, डॉ.विजया,डॉ.स्वाती, डॉ.वैष्णवी, डॉ.श्रध्दा, डॉ.जोत्सना यांनी भाग्यश्रीचा सन्मान केला. रोटरी क्लब नंदीग्रामच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अनुराधा राऊत, सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता देवरे-चिखलीकर, डॉ.जोत्सना राठोड,डॉ.करुणा पाटील, डॉ.गायत्री वाडेकर,डॉ.शुभांगी पतंगे, डॉ.सौ.पालीवाल, डॉ.सौ.गरुडकर, डॉ.शुभांगी पाटील, सौ.स्मिता गादेवार, सौ.सुनंदा दवणे, डॉ.सारिका झुंजारे यांनी येथोचित गौरव केला.
निनाद फाऊंडेशनच्यावतीने डॉ.लव्हेकर, बासोडेकर परिवार, डॉ.मोहित सोलापूरकर, डॉ.प्रितीबाला कदम, गजानन उंबरकर, डॉ.सोमाणी, गजानन लसनकर आदींनी तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर नांदेडच्यावतीने सौ.कल्पना डोंगळीकर, सौ.मंगला पाटील, डॉ.शिवाजीराव भोसले, शिवाजीराव हाळदेकर, डॉ.शुभांगी पाटील, डॉ.ॠषीकेश जाधव, डॉ.स्मिता मोरे, माधुरी पाटील, विलास धोंडगे, सोमनाथ रातोळीकर, जगन्नाथ बावणे, व्यंकटराव जाधव, संगीता शिंदे आदींनी भाग्यश्री जाधवचा यथोचित सन्मान केला.
यावेळी भाग्यश्री जाधव हिच्या संपूर्ण जीवनाची संघर्ष कहाणी दाखविणारी चित्रफित दाखविण्यात आली. या शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन शुभनारायणा फिजिओथेरोपी सेंटरच्या प्रमुख व प्रसिध्द डॉ.शुभांगी पाटील यांनी केले. या कार्यक्रमास सौ.कुंजम्मा काब्दे,प्रा.अशोक सिध्देवाड, ॲड.धोंडीबा भालेराव, सतिश निरपणे, भगवानराव जाधव, बालासाहेब कदम, वरिष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, ज्येष्ठ छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्यासह भाग्यश्रीचे कुटुंबिय,विविध क्षेत्रातील मान्यवर व डॉक्टर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.प्रणव भोसले,डॉ.लक्ष्मी भोसले, डॉ.प्रतिमा वेलदोडे,संगीता शिंदे, डॉ.वैष्णवी राठोड, डॉ.ॠषीकेश येन्नावार, डॉ.खुशी कौर, डॉ.वर्षा गोरे, चेतन पडोळे,डॉ.मनिषा ताजणे, डॉ.स्वाती सोनटक्के, डॉ.श्रावणी बारबस्टेवार, डॉ.ज्योत्सना गवळी, डॉ.नंदीनी बाहेती, डॉ.आर.एन.सहानी, डॉ.आकांक्षा देवणे, अपर्णा भोसले, डॉ.विजया गुंडेवार, डॉ.श्रध्दा आंबेगावकर, डॉ.आशीष शिंदे आदींनी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या