🌟परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या जयंती निम्मित अभिवादन....!


🌟यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते प्रमोद अशोकराव अंभोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी (दि.२८ सप्टेंबर २०२४) भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य देशाला अर्पण करणारे आद्य क्रांतिकारी शहीद वीर भगत सिंग यांच्या 117 व्या जयंती निमित्त  वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीने आज दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी परभणी शहरातील जुना मोंढा परिसरातील शहीद वीर भगत सिंग कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे शहीद वीर भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून "शहीद भगत सिंग अमर रहे, इन्कलाब जिंदाबाद" अश्या घोषणाबाजी करत जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले आहे. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते प्रमोद अशोकराव अंभोरे, कमलेश ठेंगे,अब्दुल कलीम भाई,राहुल पवळे, भगवान थोरात, शंकर बनसोडे, विनोद वाडेकर, शुभम कोरडे, सिद्धार्थ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप वायवळ, प्रसाद गोरे, समाजहित न्युज चॅनलचे व्यवस्थापक प्रतिनिधी शेख अझहर तसेच सिकलकरी बांधव अजितसिंग बावरी, भोलासिंग टाक, राजकुमारसिंग टाक, जगदिपसिंग टाक, माखनसिंग टाक, भगतसिंग टाक, शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ चे पदाधीकारी व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व शालेय विध्यार्थी उपस्थित होते. हा अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ चे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते हरदीप सिंग बावरी, सभासद कार्यकर्ते प्रमोद अशोकराव अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते अजितसिंग बावरी आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या