🌟अतिवृष्टीने बाधित शेतजमिनीचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन शासनाकडे पाठवा....!


🌟राज्याचे मदत‌ व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश🌟 


परभणी (दि.09 सप्टेंबर 2024) :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत जमिनीचे वस्तुनिष्ट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी अहवाल शासनाकडे त्वरीत पाठवावा एकही नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडलेल्या बैठकीत श्री. पाटील बोलत होते. बैठकीस सर्वश्री आमदार रत्नाकर गुट्टे, मेघनाताई बोर्डीकर, राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषि, महावितरण, आरोग्य, बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यात सर्वच मंडळात अतिवृष्टी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. या शेतजमिनीचे काळजीपूर्वक  पंचनामे करावेत. याशिवाय झालेल्या जिवित व वित्त हानीचेही बारकाईने पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. बांधकाम विभागाने नुकसान झालेले रस्ते, पूल यांची तातडीने दुरुस्ती करावी. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रस्ते, पूल, बंधारे दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. महावितरण विभागाने तुटलेल्या तारा, पोल दुरुस्त करावेत. पाऊस ओसरल्यानंतर शेतपंपांना नियमित वीजपुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने साथरोग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. रोगराई नियत्रंणासाठी आवश्यक फवारणी करावी. पाणीपुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरळीत राहिल याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी मंजूर निधीचे तातडीने वितरण पूर्ण करावे. जे शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना प्राधान्याने मदतीचे वितरण करावे. प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यात झालेले पर्जन्यमान, पंचनाम्याची स्थिती, नुकसान, मदतकार्य याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या