🌟जिल्हाभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करीता हा उपक्रम राबवला जात आहे🌟
नायगाव /नांदेड फोटो
नांदेड :- नांदेड जिल्ह्यात समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील 2273 शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून याच धर्तीवर ८८ शाळा मध्ये संगणक प्रयोग शाळा स्थापित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक इन्स्ट्रक्टर सुद्धा रुजू करण्यात आलेला आहे या मुळे जिल्हाभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करीता हा उपक्रम राबवला जात आहे.
आधुनिक काळात स्पर्धेत टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावीच लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट डोळ्या समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर. विमला मॅडम यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे.यातून विद्यार्थ्या साठी ही संधी उपलब्ध झाली आहे.
यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यातील 88शाळेमध्ये हा उपक्रम चालू असून, अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती आर विमला मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे व नांदेड जिल्ह्याचां शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे मॅडम(प्रा.) यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे, तर येणाऱ्या काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.....
0 टिप्पण्या