🌟संत सेवालाल महाराज बंजारा लभान तांडा समृध्दी अंतर्गत गटातील अशासकीय समिती सदस्यपदी आर.के.राठोड यांची निवड...!


🌟पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार करण्यात आली निवड🌟

फुलचंद भगत

वाशिम : राज्यातील बंजारा समाजाचा सर्वांगिण विकास करण्याच्या व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाकडून संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. याच अनुषंगाने ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. तांडा सुधार २०१९/प्र.क्र.६७/आस्था- ५ २३ फेब्रुवारी २०२४ चे शासननिर्णयानुसार संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजना अंतर्गत तांडावस्ती घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, तांड्याला महसुली गाव घोषित करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हास्तरिय समिती व याच योजनेंतर्गत करावयाच्या कामाच्या ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेला प्राधान्यक्रम वनिकड लक्षात घेता कामांची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे प्रावधान आहे. सदर दोन्ही समितीमध्ये बंजारा समाजाचे प्रत्येक समितीमध्ये दोन असे एकूण चार प्रतिनिधी अशासकीय सदस्य म्हणून घेण्याचे निर्देश आहेत.

त्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचेशी चर्चा करुन शासन निर्णयात नमुद निर्देशान्वये जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीमध्ये राजेश कनिराम राठोड, रा. धानोरा, ता. मंगरुळपीर व अभिषेक दिलिप चव्हाण, रा. फुलउमरी, ता. मानोरा यांची व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांचे अध्यक्षतेखालील समितीमध्ये दिलिप रामभाऊ जाधव, रा. जोडगव्हाण, ता. मालेगांव व सुरेश शेषराव राठोड, रा. सावरगांव, ता. मंगरुळपीर या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. शासनाकडून बंजारा समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकीच एक असलेल्या संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजनेमुळे बंजारा समाजबांधवांचे तांडे वस्त्या ह्या मुख्य प्रवाहात येऊन त्याचा विकास अधिक प्रभाविपणे होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या