🌟अधिकार्यांनी दिलेले काम अचूकपणाने पार पाडावे कुठल्याही प्रकारे कामामध्ये हलगर्जीपणा करू नये असे निर्देश त्यांनी दिले🌟
परभणी (दि.13 सप्टेंबर 2024) : परभणी महानगर पालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी आज शुक्रवार दि.13 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील श्रीगणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली.
परभणी शहरातील सुभाष रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक,गुजरी बाजार,गांधी पार्क,स्टेशन रोड,नारायण चाळ आदी भागांची पाहणी करून आढावा घेतला यावेळी त्यांच्यासमवेत तीनही प्रभागांचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे,सोमनाथ बनसोडे,प्रिया गोरखे,शहर अभियंता वासिम पठाण,पवन देशमुख, सोहेल सिद्दिकी,शेख अत्तर,राजकुमार जाधव,रामेश्वर कुलकर्णी, दिपक कानोडे आदी उपस्थित होते.
अधिकार्यांनी दिलेले काम अचूकपणाने पार पाडावे, कुठल्याही प्रकारे कामामध्ये हलगर्जीपणा करू नका असे सांगत ज्या मार्गाने नागरिकांसह वाहने जाणार आहेत त्या मार्गावरील स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिले. काही व्यापार्यांनी आपले साहित्य रोडवर ठेवले आहे त्यांना ते साहित्य काढून घेण्याच्या सूचना करा असे ते म्हणाले.......
0 टिप्पण्या