🌟विकासासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील विकासाचा खेळखंडोबा🌟
'आमच गाव म्हणं समद्या तालुक्यात लयं सुंदर राव ? गावचे भ्रष्ट पुढारी अन् बेईमान अधिकारी घालतायं गावच्या विकासाच्या नावावर शासकीय तिजोरीवर जबरदस्त घाव अन् निर्लज्ज मतदार म्हणतात गावचा विकास जळू द्याना राव ? तुम्ही फक्त सांगा एका मताला किती देसाल हो भाव'
पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांची एकंदर अशी दयनीय अवस्था झाली असून ग्रामीण भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारचा देखील कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतरही अनेक गावांतील विकास कागदोपत्री दाखवून विकासनिधी भ्रष्ट पुढाऱ्यांनी आणि बेईमान नौकरशहांनी मर्जीतील गुत्तेदारांच्या माध्यमातून गिळंकृत करण्याचा आसूरी डाव खेळण्याचा उद्योग आरंभल्याने विकासाअभावी मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला देश स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षी देखील अक्षरशः नर्खयातना भोगाव्या लागत असल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा तालुक्यातील शासनाचा 'आदर्श गाव' संत गाडगेबाबा सुंदर गाव आदींसह विविध शासकीय पुरस्कार प्राप्त झालेल्या पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील गौर गावातील परिस्थिती बघितल्यास संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग निश्चितच आठवतो....
तुका म्हणे ऐशा नरा |
मोजुनी माराव्या पैजारा ||
पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर जवळपास पाच ते सहा हजार लोकवस्ती असलेले व जागृत देवस्थान श्री सोमेश्वर महादेव या देवस्थानामुळे संपूर्ण मराठवाड्यात नावलौकिक असलेल्या गौर गावाच्या विकासासंदर्भात विचार केल्यास राज्य व केंद्र सरकारकडून गौर ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील गावातील सार्वजनिक रस्ते,सार्वजनिक रस्त्यावरील पथदिवे,सार्वजनिक नाल्या,पाणीपुरवठा योजना आदींसह विविध मुलभूत नागरी सुविधांची अक्षरशः वाट लावण्याचे काम भ्रष्ट पुढाऱ्यांसह बेईमान नौकरशहांनी केल्यामुळे गावातील सार्वजनिक रस्ते अक्षरशः पांदनरस्त्यात रुपांतरीत झाले असून गावातील ग्रामस्थांना अक्षरशः चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत असल्याने ग्रामस्थ माता-भगिनी गौर ग्रामपंचायत प्रशासनाच्या नावाने अक्षरशः बोटं मोडतांना पाहावयास मिळत आहेत सार्वजनिक रस्त्यांप्रमाणेच गावातील बोगस अंडरग्राऊंड नाल्यांची देखील अवस्था झाली असून या नाल्यांतील गलिच्छ पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे श्री सोमेश्वर महादेव देवस्थानात दर्शनासाठी जाणाऱ्या/येणाऱ्या भाविकांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाणाऱ्या/येणाऱ्या शिक्षक शिक्षिकांसह विद्यार्थी विद्यार्थीनींना अक्षरशः रस्त्यावरील चिखलासह नाल्यांतील गलिच्छ पाण्यातून जाणं येणं करावं लागतं असून पाणीपुरवठा योजनेची देखील अक्षरशः वाट लागली असल्याचे निदर्शनास येत असून जलजिवन मिशन योजने अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनेला मोठ्या प्रमाणात निधी आला असतानाही अनेक लोकांना घरपोच पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे सार्वजनिक रस्त्यांवरील पथदिवे देखील लपंडाव खेळत असल्याने गावात 'अंधेर नगरी चौपट राज' अशी अवस्था झाल्याचे दिसून येत असून संबंधित गौर गावातील ग्रामपंचायत प्रशासन व भ्रष्ट पुढाऱ्यांनी गावच्या विकासाला कशा पद्धतीने मुठमाती दिली याचा प्रत्यक्ष अनुभव समस्त ग्रामस्थ घेतांना दिसत आहेत.......
0 टिप्पण्या