🌟परभणी जिल्ह्यातील कत्तलखाने जैन धर्मियांच्या पर्युषण पर्व महोत्सवात बंद ठेवा.....!


🌟परभणी महापालिका आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाकडे सकल जैन समाजाने केली मागणी🌟 

परभणी : जैन धर्मियांचे पर्युषण पर्व महोत्सवाला आज मंगळवार दि.०३ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून हा पर्युषण पर्व महोत्सव दहा दिवस अर्थात १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालणार असून या जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वा दरम्यान परभणी जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने दहा दिवस बंद ठेवावेत अशी मागणी सकल जैन समाजाने परभणी महानगरपालिका आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

              संपूर्ण राज्यात जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्या संदर्भात शासनाचे स्पष्ट आदेश जारी झाले आहेत परंतु परभणी जिल्ह्यात या अनुषंगाने प्रशासनाने ०३ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या दहा दिवसात कत्तलखाने बंद करण्या संदर्भात आदेश निर्गमित केलेले नाहीत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात संपूर्णपणे कत्तलखाने बंद राखणे हे नितांत गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी सकल जैन समाजाचे नितेश जैन झांबड, नरेंद्र मुथा, श्रीकांत अंबुरे जैन, अभिजित संघई, डॉ. बाहुबली लिंबाळकर आदींनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या