🌟पुर्णा तालुक्यातील भाटेगाव येथील उच्च शिक्षित तरुण पंकज कऱ्हाळे यांचे वयाच्या २४ व्या वर्षी कॅन्सर मुळे दुःखद निधन...!


🌟त्याच्या पश्चात आई वडील भाऊ तिनं काका आजी आजोबा असा मोठा परिवार🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील भाटेगाव येथील उच्च शिक्षित (बिएससी अँग्री/एमबीए) पर्यंत शिक्षण घेतलेला होतकरू तरुण पंकज शेषेराव कऱ्हाळे यांचे वयाच्या 24 व्या वर्षी यांचे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले.

 त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण भाटेगावावर शोककळा पसरली आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करणार की त्याला कॅन्सर रोगाने पछाडले व त्यांचे जिवनच संपवले अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे पंकजला गावकरी आदराने पहात आपल्या जिवनात त्याने आपल्या कर्तृत्व आणि मनमिळावू स्वभावामुळे असंख्य जिवलग मित्र कमवले त्याच्या पश्चात आई वडील भाऊ तिनं काका आजी आजोबा असा मोठा परिवार आहे माजी सभापती दिगंबर कराळे यांचा तो पुतण्या होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या