🌟मुदगल बंधाऱ्याची पाणीपातळी ९७ टक्के : दोन दरवाजातून विसर्ग सुरु....!


🌟पुर्णा आणि मुदगल प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू : नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा🌟

परभणी (दि.०१ सप्टेंबर २०२४) : मुदगल उच्च पातळी बंधारा   आज रविवारी (दि.०१) रोजी ९७ टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता मुदगल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले असून,४९८ क्युमेक्सने तर पुर्णा नदीपात्रात ४९.६० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. 


तरी मुदगल उच्च पातळी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य,  इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी प्रशासकीय स्तरावरून  नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या