🌟गोदावरी नदीच्या पात्रात सहा दरवाज्यांतून तब्बल 3 हजार 144 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु🌟
परभणी (दि.09 सप्टेंबर 2024) : जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर जलाशयातून आज सोमवार दि.09 सप्टेंबर 2024 रोजी गोदावरी नदीच्या पात्रात सहा दरवाज्यांतून तब्बल 3 हजार 144 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
या प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु झाली. सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत प्रकल्पात 97.30 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक तसेच उर्ध्व भागातील प्रकल्पांमधून होणारी पाण्याची आवक ओळखून गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी सोमवारी दुपारी 12.40 वाजता या जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे एकूण 27 दरवाजांपैकी 10, 16, 18, 19, 21 आणि 27 हे सहा दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने वर उचलून जलाशयातील पाण्याचा गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला. या सहा दरवाजातून 3 हजार 144 क्यूसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे. या खात्याचे अधिक्षक अभियंता साबिनवार यांच्याहस्ते या प्रकल्पाच्या दरवाजाचे व पाण्याचे पूजन करुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
दरम्यान, या प्रकल्पात पाणलोट क्षेत्रातून होणार्या पाण्याची आवक ओळखूनच पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात केला जाईल, असे अभियंत्यांनी जाहीर केले.....
0 टिप्पण्या