🌟भारतामध्ये असा एक धम्म होऊन गेला की ज्याने या जगाला विज्ञानवाद शिकवला🌟
डॉ ए.पी.जे.के अब्दुल कलाम यांनी भारत हा महासत्ता होईल असे म्हंटले होते. परंतु महासत्ता होणं हे विज्ञानशिवाय होणे अशक्य...त्यातही भारतासाख्य अंधश्रद्धा रूढी परंपरावादी देशामध्ये.....या देशातील अंधश्रद्धा दूर करून लोकांना विज्ञानवाद शिकवण्यासाठी भारताच्या अनेक पिढ्या गेल्या. पण अद्यापही विज्ञानवाद स्वीकारण्यात आला नाही याउलट केवळ तंत्रज्ञान स्वीकारण्यात आले. भारतामध्ये असा एक धम्म होऊन गेला की ज्याने या जगाला विज्ञानवाद शिकवला. मानवतावाद आणि बुद्धिप्रमान्यवाद शिकवून प्रत्येक घटना घडन्यामागील कार्यकारणभाव असतो. हे सत्य सांगितले पण सत्य केवळ सांगुन चालत नाही त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो. लोकांमध्ये जावं लागतं.. आणि आपल्यातील स्व ला विसरून सत्याशी समरस व्हावं लागतं... खरंच हे इतकं सोपं असतं का.. तर मुळीच नाही... आणि हा त्याग केल्याशिवाय बुद्धत्व प्राप्त होणे देखील शक्य नाही. गौतमाचा .. गौतम बुद्ध होण्याचा प्रवास अनेक काट्यानी आणि अंधाराने झाकोळलेला होता परंतु त्यांनी तरीही हे जग देदिपेयमान करून सोडले. आज त्या ज्ञानाचा प्रकाश घेऊन अनेक धम्म सेवक या जगाला दुःखापासून मुक्त करण्यास निघाले आहेत.. असाच एका धम्म सेवकाचा प्रवास पाहू. पूर्णा या ठिकाणी एक मुलं जन्माला आले. आई वडिलांना पुत्ररत्न झाल्याचा मनस्वी आनंद झाला. आई आपल्या बाळाला कुरवाळत होती. जणू तिला कळून चुकले असावे आपलं बाळ जास्त काळ आपल्या कुशीत राहणार नाही. नाव बाळाचे " सुरज " ठेवले सूरज सूर्याप्रमाणे तळपणार आणि जगाला प्रकाशित करणार ही कदाचित आईवडिलांची आशा. सुरज आईवडिलांना एकटाच होता त्यामुळे लाडका ही तेवढाच. त्याचे नाव शाळेत घातले पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद याठिकाणी केले. आणि सातवी आणि दहावी पर्यंतचे शिक्षण डॉ.आंबेडकर शाळेत पूर्ण केले. तिथे सुरज ने आंबेडकर साहित्य आणि बुद्ध धम्माचा अभ्यास केला. भगवंताच्या धम्माने सूरजला एक नवीन जन्म दिला. सूरज या धम्मवार वाचन, मनन करु लागला. आणि मग काय हा धम्म् त्याच्या बुद्धीत मनात आणि नसानसात पेरला गेला. आणि मग वेळ आली आपले संपूर्ण जीवन या धम्म कार्यासाठी घालवणे. हा निर्णय खूप धाडसचा होता. पण या जगातील दुःख नष्ट करायाचे असेल तर गृहस्थी जीवनाचा त्याग करणे आवश्यक आहे. त्यानंतर महान तपस्वी आदरणीय डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या कडून सूरजने दिक्षा घेतली. आणि सूरज चे संघरत्न भंतेजी झाले. सूरज हे नाव जरी मिटले असले तरी संघरत्न हे रत्न आम्रवण महाविहाराला प्रकाशीत करण्याचे काम करत आहे.
आम्रवण महाविहार म्हणजे प्रसन्न स्थळ जणू बुद्धाचा सहवास लाभलेला असावं असा भास मनाला होतो. आदरणीय संघरत्न भन्तेजी आपला एक.. एक श्वास या आम्रवण महावीर साठी खर्च करतात. आम्रवण महाविहार मध्ये राहून आणि त्याठिकाणी धम्माचे पूर्ण ज्ञान घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी गावागावात जाऊन केला. तर ते तेवढ्यावरच नाही थाम्बले त्यांनी श्रीलंका याठिकाणी जाऊन बौद्ध धम्म त्याची संस्कृती याचा अभ्यास केला तेथून प्रेरणा घेऊन बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले. बाबा आमटे एका ठिकाणी म्हणतात ना की शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई.. दुःख उधळण्यास आता असावाना वेळ नाही. भलेही या वाटेवर चलताना त्यांना अनेक दुःख वाट्याला आले. मान सन्मान टीका या सर्व गोष्टीचा सामना केला पण आपले धम्माचे कार्य सतत करत राहिले. संघरत्न भंतेजी यांनी बुद्ध मूर्तिचे काम चालू ठेवले विद्युत पुरवठाचे देखील काम त्यांनी चांगले केले. रोडचे काम असो की कोणतेही मोठंया हिमतीने त्यांनी कार्य चालूच ठेवले. आता आम्रवण महाविहार एक संस्कार केंद्र बनले. पर्यावरण ही आपल्या भारतातील सर्वात मोठी समस्या बनली. पण वृक्षारोपनाचे कार्यक्रम आदरणीय संघरत्न भंतेजी यांनी केले. तसेच स्थानिक राजकीय तसेच सामाजिक कार्यात काम करणाऱ्या वेक्तीना धम्माचे धडे देऊन हा धम्म त्यांच्या हृदयापर्यंत पोहचवण्याचे काम त्यानी केले. आणि हा धम्म सर्व जाती धर्म पंथ प्रांतापयन्त नेऊन घटनेला अपेक्षित असणारी लोकशाही प्रस्थापित करण्याच बहुमूल्य काम आदरणीय भंतेजी संघरत्न करत आहेत. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.....
- डंबाळे प्रियंका
26 जानेवारी संविधान विचारमंच संचालिका (सदरील लेख हा आदरणीय भन्ते संघरत्न यांनी विषद केलेल्या माहितीवर आहे.)
0 टिप्पण्या