🌟बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीला भव्य नगारा भवन लोकार्पण सोहळ्याचे २६ सप्टेंबर रोजी आयोजन......!


🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तें होणाऱ्या नगारा भवन लोकार्पण सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

🌟जिल्हा परिषद सदस्य आर.के.राठोड यांनी बंजारा समाज बांधवांना केले आवाहन🌟

फुलचंद भगत

वाशिम :- संपूर्ण बंजारा समाजामध्ये वरील ब्रीद वाक्य तांड्या तांड्या मध्ये आवडीचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज समाधीस्थळी येत्या २६ सप्टेंबर ला देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या शुभ हस्ते नंगारा भवनाचे लोकार्पण केले जाणार आहे. हया सोहळ्याला मंगरूळपिर तालुक्यातील सर्व लहान थोर मंडळी आणि महिला भगिनींनी उपस्थीत राहून या सुवर्ण क्षनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आर.के.राठोड जिल्हा परिषद सदस्य वाशिम यांनी केले आहे. 


३ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रसंत डॉ रामराव महाराज बापू यांच्यासह अनेक मंत्री आणि भक्तगण च्या साक्षीने पोहरादेवी येथे नंगारा भवनाचे भूमिपूजन ना. संजय भाऊ राठोड यांच्या अथक प्रयत्नांनी मंजूर करून कऱण्यात आले होते. ती नंगारा भवनाची वास्तू पूर्णत्वास आली असून सदर वास्तूचे लोकार्पण देश्याचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री बंजारा समाजाची आण बाण शान मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय भाऊ राठोड आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य मंत्री महोदयांच्या साक्षीने पोहरादेवी येथे संपन्न होणार आहे. पोहरादेवी आणि उमरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता आजपर्यंत ७२५ कोटी रुपयाचा विकास कामांचा निधी पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी आपल्या प्रयत्नाने सरकारकडून मंजूर करून आणला आहे. त्यामूळे  २६ सप्टेंबर ला बंजारा विरासत नंगारा म्युझियम वास्तूचे लोकार्पण करण्याकरिता आपण सुद्धा हजर राहून साक्षीदार व्हावे असे आवाहन आर. के.राठोड जिल्हा परिषद सदस्य यानी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या