🌟मानवतेचा स्पर्श लाभलेल सुसंस्कृत संवेदनशील हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व धाडसी नेतृत्व 'परभणी रत्न' आदरणीय उत्तमभैया खंदारे.....!


🌟पुर्णा तालुक्यातील राजकीय रणक्षेत्रातील निथड्या छातीचा कर्तृत्ववान लोकहीतवादी निर्मळहदयी अस्सल वाघ🌟


'व्यक्ती आणि व्यक्तीमत्व'

 ✍🏻लेखक - श्रीकांत हिवाळे सर 

 पुर्णा (व्यक्ती आणि व्यक्तीमत्व) पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यातील राजकीय रणक्षेत्रातील निथड्या छातीचा कर्तृत्ववान लोकहीतवादी निर्मळहदयी अस्सल वाघ म्हणून ज्यांनी स्वकर्तृत्वाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात समाजकारणात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली असे पुर्णा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेतील गटनेते व भावी नगराध्यक्ष 'परभणी रत्न' उत्तम भैया खंदारे यांचे समस्त जीवन आणि कार्यकर्तृत्व समस्त मानव जाती समोर निश्चितच प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक अशा स्वरूपाचं आहे.


महामानव तथागत भगवान बुद्ध रयतेचे बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना आपणे सर्वोच्च आदर्श मानून राजकीय/सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या वैभवशाली पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत.

 भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष सुप्रसिद्ध समाजसेवक बौद्धाचार्य एम.यु.खंदारे व पूर्णा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय व सामाजिक कार्यास सुरुवात केली भारतीय दलित पॅंथर चळवळीमध्ये नामांतर आंदोलनामध्ये ज्यांनी  सक्रिय सहभाग घेतला होता अशा त्यांच्या पूज्य मातोश्री गयाताई खंदारे  पूर्णा शहरामध्ये पॅंथर चळवळीतील अग्रणी सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित पॅंथरचे मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले होते त्यामध्ये त्या निवडून आल्या होत्या.

 सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या हिताला   प्रथम प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुख नगरसेविका म्हणून त्यांचा नावलौकिक होता आई-वडिलांच्या विचाराचा समृद्ध वारसा गेली दोन दशकापेक्षाही जास्त उत्तम भैया खंदारे अगदी तळमळीने चालवत आहे पूर्णा नगरपालिकेचे दोन वेळा उपनगराध्यक्ष पूर्णा नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक गटनेते म्हणून त्यांची काराकीर्द 'न भुतो न भविष्यती' अशी उल्लेखनीय राहिली आहे राजकारणाला आदर्श समाजकारणारणाची धम्मकारणाची जोड दिल्यानंतर पार पडणारा प्रत्येक कार्य अतिशय सर्वांग सुंदर होऊ शकतो या बाबींचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे उत्तम भैया खंदारे यांच्या राजकीय सामाजिक काराकीर्दीमध्ये फलद्रूप झालेले समाज उपयोगी उपक्रम शाश्वत काळासाठी चिरंतन राहणार आहे.

तथागत मित्र मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष अगदी विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्या सर्जनशील व संघटन कौशल्यातून तथागत लेझीम पार्टीची स्थापना करून पूर्ण जिल्ह्यामध्ये व जिल्हा बाहेरही तथागत लेझीम स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये व शहरांमध्ये तथागत लेझीम पथकाला बोलावल्या जायचं तथागत लेझीम पथकाचे पुढे तथागत मित्र मंडळ झालं.या मध्ये उच्चशिक्षित चारित्र्य संपन्न तरुणाईचा भरणा होता या पैकी मोठ्या प्रमाणावर बरेच जन शासकीय निमशासकीय सेवेमध्ये अधिकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे उत्तम भैया सुद्धा प्रखर देशभक्तीचा वसा घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते काही वर्षे त्यांनी त्या ठिकाणी सेवा सुद्धा केली परंतु कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन पूर्णा शहरांमध्ये परतले. पुनश्च त्यांनी आपल्या सामाजिक धार्मिक कार्यास सुरुवात केली.

बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे म्हणून पूर्णा शहरातील अनेक पॅंथर सहभागी झाले होते त्यामध्ये त्यांच्या पूज्य माता गया ताई खंदारे ह्याही सुद्धा होत्या. नामांतर आंदोलनामधल्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी त्यांच्या आई बालपणी त्यांना सांगायच्या नामांतर आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी होता जरी आल नाही. तरी नामांतर लढ्याचा रोमहर्षक इतिहास येणाऱ्या पिढीसमोर यावा त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी या उदात्त हेतूने त्यांनी तथागत मित्र मंडळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन सोहळा अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये  साजरा करण्यास सुरुवात केली.

 नामांतर आंदोलनामध्ये ज्यांनी स्वतःच्या घराची राख रांगोळी केली शहीद झाले अशांच्या कुटुंबियांना त्यांच्या वारसांना नाम विस्तार दिन सोहळ्यामध्ये सन्मानपूर्वक बोलावून त्यांचा यथोचित गौरव सातत्यपूर्ण केल्या जातो नामांतर लढ्यामध्ये ज्यांनी समर्थ नेतृत्व केलं असे दिवंगत पॅंथर नेते आदरणीय गंगाधर जी गाडे साहेब, लॉन्ग मार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे दिवंगत एडवोकेट गौतम दादा भालेराव पॅंथर नेते रतन कुमार पंडागळे लोकनेते विजय वाकोडे व इतर अनेक नेते यांना सन्मानपूर्वक बोलावून त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून नामांतर लढ्याच्या रोमहर्षक इतिहासाला उजाळा दिला. 

त्याचप्रमाणे मंत्रालयामधील उच्चपदस्थ अधिकारी सहसचिव आदरणीयसिद्धार्थ खरात, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत  व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशन करण्याऱ्या महाराष्ट्र शासनाच्या समितीचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे आमदार अमोल मिटकरी व इतर अनेक मान्यवरांची व्याख्याने नामविस्तार दिन सोहळ्यामध्ये आयोजित केली. नामांतर लढ्याच्या आठवणी स्मरणिकेच्या रूपाने कायमस्वरूपी राहाव्या त या हेतूने त्यांच्या कल्पकतेतून दूरदृष्टीतून आदरणीय उत्तम भैया खंदारे यांना राजकारणापेक्षा समाजकारणाची धम्म कारणाची आवड त्यामुळे पूर्णा शहरामध्ये संपन्न होत असलेली अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडणारी धम्म परिषद बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण शहरांमध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये पार पडणारी जयंती यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

 त्यांचं बुद्ध धम्मा प्रति असलेल्या प्रेम त्यांनी स्वखर्चातून उभी केलेली सांची येथील ऐतिहासिक स्तूपा समोर असलेली कमान त्याची प्रतिकृती डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी मुख्य रस्त्यावर त्यांनी साकारली.तशाच प्रकारची प्रतिकृती त्यांची जन्मभूमी वाई गोरक्षनाथ जिल्हा हिंगोली या ठिकाणी साकारली सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचं भरीव योगदान सर्वश्रुत आहे एक निगर्वी निर्मोही व्यक्तिमत्व म्हणून ते सुप्रिचित आहेत. सर्व जाती धर्मामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या अर्धांगिनी विशाखा ताई यांचा मोलाचा वाटा असतो. धम्मा मधील पवित्र वर्षावासामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचं  त्या पठण करतात. उपोसतवृत्त धारण करतात त्यांच्या जीवनवेलीवर सुबोध आणि सम्यक ही सुंदर फुले उमलली आहेत.

 दोघेही उच्च शिक्षण घेत आहे उत्तम भैया आणि विशाखा ताई  परिवारामधील ज्येष्ठ या नात्यांन संपूर्ण परिवाराला प्रेमाच्या आपुलकीच्या धाग्यामध्ये गुंफण्याचे काम करतात एक आदर्श एकत्र कुटुंब पद्धती त्यांच्या घरामध्ये पहावयास मिळते आज आदरणीय उत्तम भैया खंदारे यांचा वाढदिवस अगदी सकाळपासून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे या मंगल प्रसंगी त्यांना व परिवाराला आयु आरोग्य बल वैभव धनसंपदा प्राप्त होवो ही मनोकामना मंगलमय शुभेच्छा....!

 शुभेच्छुक श्रीकांत हिवाळे सर 

 माजी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा

 पूर्णा जिल्हा परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या