🌟 राज्याचे मदत व पूनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांना दिले आश्वासन🌟
पुर्णा (दि.०९ सप्टेंबर २०२४) :- अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येवून त्याचे पाणी शेतीपीकात शिरुन पिकांचे प्रचंड नुकसान झाले.यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.माटेगाव आहेरवाडीसह पूर्णा तालूक्यातील सर्वच पिक नुकसानीत अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना सरकाराच्या वतीने तात्काळ मदत व पंचविस टक्के अग्रीम पीक विमा देण्यात येईल.शेतक-यांनी खचून जावू नये.महायुत्ती सरकार शेतक-यांच्या पाठीशी आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मदत व पूनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांनी पूर्णा तालूक्यातील शेतीनुकसानीत पूरग्रस्त आहेरवाडी येथे ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय दौ-या निमीत्त येवून पाहणी केली त्यावेळी बोलताना केले.या प्रसंगी आमदार राजेश विटेकर,आ.रत्नाकर गुट्टे छगनराव मोरे,गणेशराव कदम,उत्तमराव ढोणे, क-हाळे,सुभाष मोरे,सुनिल खंदारे, डिगांबर खंदारे, बालाजी खंदारे, बालाजी मोरे, बबन मोरे,शिवाजी बोबडे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर मंत्री ना अनिल पाटील यांनी माटेगाव येथेही जावून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
* आहेरवाडीत चारशे शेतकऱ्यांनी लाईन धरुन दाखवले नुकसानीत पीक :-
या प्रसंगी,आहेरवाडी येथे नदीकाठच्या पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त चारशे शेतक-यांनी लाईनीने उभे राहून त्यांच्या शेतीत पूराचे पाणी शिरुन व अतिवृष्टीने नुकसानीत झालेल्या पिकाचे अवशेष दाखवून मदतीची मागणी केली.या सर्व शेतक-यांजवळ जावून मंत्री अनिल पाटील यांनी हितगुज साधत तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या