🌟असे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟
परभणी (दि.12 सप्टेंबर 2024) :- परभणी जिल्ह्यात दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजीपासुन दिपावली सण साजरा करण्यात येणार आहे. दीपावली सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना पंधरा दिवसाचे कालावधीसाठी फटाके विक्रीसाठी तात्पुरते फटाके परवाना देणे संबंधाने The Explosives Rules, 2008 मधील कलम 84 व केंद्रशासनाचे पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन, विभाग नवी दिल्ली यांचे परिपत्रकातील नमुद सुचनांच्या अनुषंगाने तसेच जाहीर प्रगटनाचे दिनांकापासुन ते दिनांक 18 सप्टेंबर, 2024 रोजीपर्यंत विस्फोटक अधिनियम 2008 मधील विहीत नमुन्यातील अर्ज दिलेल्या मुदतीत स्विकारले जातील, मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत नसल्याचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.
परवान्याच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक फटाके विक्री दुकानातील अंतर है कमीत-कमी 3 मीटरचे असावे. दुकाने मोकळ्या जागी व्यवस्थित कोणत्याही प्रतिबंधित इमारतीपासुन 50 मीटर पेक्षा कमी अंतरावर नसावीत. प्रत्येक फटाके विक्री दुकानातील स्टॉक मर्यादा जास्तीत जास्त 100 किलो राहील. पोलिस अधिक्षक, परभणी यांचा कायदा व सुव्यवस्था, अर्जदाराची वर्तणुक आणि दुकानाचे बाबतीत अर्जदाराने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले किंवा कसे या बाबत सर्वकष अहवाल. महाराष्ट्र नगर पंचायत व औद्यो गिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 281 अन्वये संबंधित महानगरपालिका, नगरपालिका यांचा परवाना, संबंधित तहसिलदार यांचे फटाक्याचे दुकानासाठी अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेले रहिवाशी बाबत पुराव्याची खातरजमा करून अर्जदार नमूद पत्त्यावर राहतात किवा कसे? याबाबत आणि अर्जदार यांचेकडून कसल्याही प्रकारची शासकीय थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच दुकानाच्या जागेच्या नकाशाची प्रमाणित प्रत, व्यवसाय कर अधिकारी, व्यवसाय कर कार्यालय, परभणी यांचे नाहरकत प्रमाणपत्र, परवानाधारकास परवान्यात नमूद केलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक राहील.
जाहीर प्रगटनाचे दिनांकापासुन ते दि. 09 ऑक्टोबर, 2024 पर्यंत विस्फोटक अधिनियम 2008 मधील विहीत नमुन्यातील अर्ज दिलेल्या मुदतीत स्विकारले जातील. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. फटाके विक्रेत्याने साठवणुक धारकाने विक्री करताना सदरील फटाक्याची आवाजाची तिव्रता 125 डेसिबल पेक्षा जास्त नसावी तसेच बेरियम साल्ट युक्त व त्या प्रकारचे फटाके साठवणुक विक्री करण्यात येवु नये असे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....
0 टिप्पण्या