🌟छत्रपती संभाजीनगर येथे 23 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान 53 पदांसाठी पदभरती मेळाव्याचे आयोजन🌟
परभणी (दि.06 सप्टेंबर 2024) : मराठवाडा पर्यावरण बटालियन 136 इन्फ्रंट्री बटालियन टीए इको, महार (एम ओ ई एफ आणि सीसी) आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांच्या (अकाली निवृत्तीसह) 23 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे 53 पदांसाठी पदभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महार 23 ते 28 सप्टेंबर 2024 या कालावधीत संभाजीनगर मिलट्री कैंट येथे माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (समाविष्ट महिला) भरती मेळावा आयोजित करण्यात आहे. (एम ओ ई एफ आणि सीसी) आणि राज्य वन विभागाचे सेवानिवृत्त 136 इन्फंट्री बटालियन टीए इकौ, महार मध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवारांनी वेळापत्रकानुसार 23 सप्टेंबर रोजी साडेपाच वाजता संभाजी नगर मिलट्री कैंट (सर्वत्र स्टेडियम) येथे शारीरिक फिटनेस चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यामध्ये उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. तसेच त्याची देशभरात कुठेही नोकरीसाठी जाण्याची तयारी असावी. ही पदभरती संभाजीनगर येथील छावणी परिसरात होणार असून, सैनिक (जीडी) 42, लिपीक 6, हाऊस कीपर, ब्लॅकस्थ्मि, मेस कीपर, आर्टीसन आणि स्टेवार्ड पदासाठी प्रत्येकी एक अशी एकूण 53 पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महारमध्ये भरतीसाठी पुढीलप्रमाणे पात्रता अटी असून, माजी सैनिकांसाठी, एमओईएफ आणि सीसी आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (अकाली सेवानिवृत्तांसह) किमान वयोमर्यादा नाही. तथापि, ते सेवानिवृत्ती/ डिस्चार्ज झाल्यापासून पाच वर्षात आतील असावा. माजी सैनिक (OR) 50 वर्षे वयापर्यंत सेवा करु शकतात. वैद्यकीय श्रेणीमध्ये आकार-1 (SHAPE-1), असून, तो आज्ञाधारक असावा. माजी सैनिक (केवळ पेन्शनधारक) आणि माजी महिला एमओईएफ आणि सीसी आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाचे कर्मचारी एमओईएफ आणि सीसी आणि महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये किमान 20 वर्षे सेवा झालेली असावी. तसेच तो सेवानिवृत्ती/डिस्चार्जच्या तारखेपासून पाच वर्षाच्या आत असावी. त्याची उंची ही 160 सें.मी. (गोरखा, गढवाली आणि आसामींच्या बाबतीत 152 सेमी)असावी.
एमओईएफ आणि सीसी आणि राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी 150 सें.मी. आणि माजी सैनिकांसाठी किमान 50 किलो, माजी महिलांसाठी किमान 42 किलो वजन असावे. छाती माजी सैनिकांसाठी 82 सें.मी. (विस्तार5 सें.मी.) आणि स्त्रिया 05 सें.मी. छातीचा विस्तार करण्यास सक्षम असावीत. शारीरिक तंदुरुस्ती चाचणीमध्ये पुरुषांसाठी 1.6 कि.मी. निर्दिष्ट वेळेत धावणे, 8 ते 9 फूट खंदकातून उडी मारून पार करण्यास सक्षम असावा. पुल-अप्समध्ये स्वतःकडे खेचण्यास सक्षम असावा. अडथळ्यांमधून तसेच उंच प्लॅटफॉर्मवर चालण्यास सक्षम असावा. माजी महिलांसाठी मुलाखत, महिला उमेदवारांसाठी वनीकरणाशी संबंधित उपक्रम आणि रोपवाटिकेतील प्रवीणता चाचणीद्वारे व्यवस्थापन आणि वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
पेन्शन पेमेंट ऑर्डर, डिस्चार्ज बुक, अलीकडील पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्रांच्या आठ प्रती, शिक्षण प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड सोबत असावे. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असावे. निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल आणि शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महारमध्ये सादर केलेली सेवा कोणत्याही प्रकारची पात्रता सेवा मानली जाणार नाही. उमेदवारांना सेवानिवृत्ती वेतन मिळणार नाही. नावनोंदणी पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आणि उपलब्ध रिक्त पदांनुसार राहणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....
0 टिप्पण्या