🌟परभणी जिल्ह्यातील 39 शाळेतील विद्यार्थी घेताहेत संगणकाचे धडे.....!


🌟जिल्ह्यातील 39 शाळांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत संगणक प्रशिक्षण उपक्रम🌟


परभणी (दि.10 सप्टेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील 39 शासकीय शाळेतील विद्यार्थी समग्र शिक्षा अंतर्गत संगणकाचे धडे घेत आहेत समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील 2 हजार 273 शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक इन्स्ट्रक्टर सुद्धा रुजू करण्यात आलेले आहे. 

आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे यामध्ये  परभणी  जिल्ह्यातील 39शाळेमध्ये हा उपक्रम चालू आहे.  राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, आर विमला  मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे व परभणी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुनील पोलास (प्रा.)  यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत  आहे. येणार्‍या काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्‍चित फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या