🌟या खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा मार्गदर्शक सज्जन जैस्वाल व प्रकाश रौंदळे यांनी केले🌟
महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मानवत येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत विद्या प्रसारणी सभेची हायस्कूल पुर्णा व अभिनव विद्या विहार प्रशाला पुर्णा शाळेतील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले व पुणे येथे होणाऱ्या 38 व्या ज्युनियर अथलेटिक्स स्पर्धेसाठी खालील खेळाडूंनी निवड झाली आहे.
यामध्ये 10 किलोमीटर चालणे व लांब उडी प्रीती आगलावे, आकांक्षा कत्ते 3 किलोमीटर चालणे, वैष्णवी शिंदे, लांब उडी वैशाली धुत,पेन्टथलाॅन ,माही कऱ्हाळे 600 मीटर धावणे प्रथम स्नेहल शिंदे 600 मीटर धावणे द्वितीय स्नेहा कापसे भालाफेक प्रथम, गौरी भोसले ट्रायथलॉन प्रथम, ऋतुजा जोगदंड ट्रॉयथलाॅन द्वितीय भालाफेक वैष्णवी कापुरे , जान्हवी भाले भालाफेक, अनुराधा स्वामी भालाफेक द्वितीय दशरथ पवार पेन्टॅथलाॅन प्रथम अभिषेक भोसले भालाफेक हर्षदा पारटकर पेन्टॅथलाॅन द्वितीय , अनुष्का मेघमाळे ट्रायथलॉन प्रथम या सर्व खेळाडूंची निवड पुणे येथे होणाऱ्या 38 ज्युनियर राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवड बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ दत्तात्रेय वाघमारे उपाध्यक्ष भिमराव कदम सचिव श्रीनिवास काबरा ,विजयकुमार रूद्रवार, उत्तमराव कदम ,साहेबराव कदम,के.एल. काकडे साहेब, बाबुराव मोरे हरिभाऊ पाटील तसेच, आनंद अजमेरा दिलीप माने मुख्याध्यापक डी एल उमाटे मुख्याध्यापक रणवीर, सर भाकरे सर शाळेतील सर्व शिक्षकांनी तसेच परभणी अथलेटीक्स असोसिएशन चे सचिव माधव शेजुळ रणजीत काकडे कैलास टेहरे यमानाजी भालशंकर अब्दुल अन्सार या सर्वांनी अभिनंदन केले या खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा मार्गदर्शक सज्जन जैस्वाल व प्रकाश रौंदळे यांनी केले......
0 टिप्पण्या