🌟पुण्यात 25 तास होऊनही गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुका सुरुच ; अजुन काही तास लागण्याची शक्यता....!


🌟शहरातील लक्ष्मी रोड,केळकर रोड, टिळक रोडवर मंडळांची गर्दी🌟

 ✍️ मोहन चौकेकर

पुण्यातील गणेश विसर्जनाच्या  मिरवणुका आज(बुधवारी) दुसऱ्या दिवशी ही जल्लोषात आणि उत्साहात सुरू आहेत. पुण्याची विसर्जन मिरवणुक सुरु होऊन 25 तास झाले आहे, मात्र अद्याप मिरवणुका सुरूच आहेत. 25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू असल्याने या वर्षी देखील मिरवणुका गेल्या वेळी इतक्याच चालणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड,टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोड वरील मिरवणुका संपल्या आहेत. लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत.

पुण्यात 25  तासाहून अधिक वेळ मिरवणूक सुरू आहे. गेल्या वर्षी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपली होती. मागील वर्षी जवळपास 28 तास मिरवणूक चालली होती. यावर्षी मिरवणूक कधी संपते या कडे लक्ष लागलं आहे. यावेळी देखील मिरवणुका उशिरापर्यंत चालतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस मिरवणुका लवकर संपवाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील अलका चौकातून आतापर्यंत 117 मिरवणुका गेल्या आहेत.

*पुण्यातील मिरवणूक संपण्यासाठी अजून काही तास तास लागण्याची शक्यता :-

 *25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अद्याप सुरूच आहे.  अजूनही आज बुधवारी दुपारी  12 वाजेपर्यंत पुण्यातील लक्ष्मी रोड,  केळकर रोड, टिळक रोडवर विविध  गणेश मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोडवरील गणपती मिरवणुका संपल्या आहेत. मिरवणूक संपण्यासाठी आणखी  काही तास लागण्याची शक्यता आहे.*

* मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आवाहन :-

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार असे दिसते  आहे.

मानाचा पहिला - कसबा गणपती

10:30 - मिरवणुकीची सुरुवात

11:10 - बेलबाग चौकात 

3:35 - अलका चौक

4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जन

मानाचा दुसरा - तांबडी   जोगेश्वरी

10:40 - मिरवणुकीला सुरुवात

12:00 -बेलबाग चौक

4:12 - अलका चौक

5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जन

मानाचा तिसरा - गुरुजी तालीम

11:10 - मिरवणुकीला सुरुवात

1:12 - बेलबाग चौक

5:16 - अलका चौक 

6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन 

मानाचा चौथा - तुळशीबाग

11:50 - मिरवणुकीला सुरुवात

2:20 - बेलबाग चौक

6:17 - अलका चौक

7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन 

मानाचा पाचवा - केसरीवाडा

12:25 - मिरवणुकीला सुरुवात

3:23 - बेलबाग चौक

6:27 - अलका चौक

7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या